ही काळजी घ्या फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून

ही काळजी घ्या फेसबुक अकाउंट हॅक होण्यापासून

अकाऊंट हॅक करून पैशांची मागणी

नाशिक । अनिरुद्ध जोशी Nashik

दिवसेंदिवस फेसबुक वापरणार्‍यांची Facebook users संख्या वाढत आहे. यामुळे हॅकर्सदेखील सक्रिय झाले आहेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक profile hack होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. फेसबुक प्रोफाईल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या मित्र-मैत्रिणींकडून पैसे उकळले जात आहेत. तसेच प्रोफाईलमध्ये स्वतःचा संपर्क क्रमांक असणार्‍यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे मागण्याचा उच्छाद वाढला आहे. फेसबुक प्रोफाईल हॅक करण्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे.

असे होते फेसबुक अकाऊंट हॅक

फेसबुक युजर्स आपले संपर्क क्रमांक फेसबुकवर ठेवत असल्याने हॅक करणारे भामटे त्यांना व्हिडिओ कॉल करतात. कॉलमध्ये युजर्सला समोरून अस्पष्ट दिसते. या कॉलचा उद्देश इतकाच असतो की, युजरचा चेहरा दिसावा. याच चेहर्‍याचा वापर करून हे भामटे एक अश्लील व्हिडिओ तयार करतात. थोड्याच वेळात युजरला एक कॉल येतो. ‘आपका अश्लील व्हिडिओ हमारे पास है. त्याचवेळी युजरच्या व्हॉटस्अ‍ॅपवर एक व्हिडिओ येतो. त्यात युजरचा चेहरा दिसतो आणि नंतर काहीतरी अश्लील क्लिप त्या व्हिडिओमध्ये टाकलेली असते.

युजरनी तो व्हिडिओ पाहिला की हे भामटे युजरकडे पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर तुमचा व्हिडिओ तुमच्या फेसबुक फ्रेंड्सला पाठवला जाईल अशा धमक्या हॅकर्स देतात. याशिवाय व्हिडिओ इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू, असेदेखील सांगितले जाते. अशा धमक्या ऐकल्यावर युजर्स घाबरून हॅकर्सच्या पैशांच्या मागणीला बळी पडतात. तसेच युजर्सचे अकाउंट हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांना हे भामटे पैशांची मागणी करतात. लोकांना असेच वाटते की, हा तर आपला मित्र आहे, याला खरेच पैशांची अडचण असेल. असे वाटून अनेक मित्र हॅकर्सनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे टाकतात. तरी पैशांच्या होणार्‍या मागणीपासून सावध राहण्याची गरज आहे, असे सायबर तज्ज्ञ सांगतात.

फेसबुक अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. फेसबुक अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून two-factor authentication चा वापर कराच परंतु अकाऊंटचा पासवर्ड कायम मजबूत ठेवा. दर आठवड्याला किंवा प्रत्येक लॉगइनच्या वेळी पासवर्ड बदला. तसेच आपली फ्रेंडलिस्ट प्रायव्हेटला ठेवा आणि फेसबुक अकाऊंटवर कुठलेही प्रायव्हेट फोटोज टाकू नका.

- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ, नाशिक.

फिशिंग म्हणजे काय ?

यात हॅकर्स फेसबुकच्या लॉगिन पेजसारखे दिसणारे फेक लॉगिन पेज बनवतात. यानंतर हॅकर्स त्या व्यक्तीच्या इमेलवर खोट्या पेजची लिंक पाठवतात, माहितीतल्या व्यक्तीला स्वतःचा मोबाइल फेसबुकसाठी वापरण्यास देतात. जेव्हा ती व्यक्ती लॉगिन आयडी, पासवर्ड त्या फेक पेजवर टाइप करते तेव्हा त्याचा ईमेल पत्ता, पासवर्ड मिळतो. हॅकर अशा रीतीने वापरकर्त्याचा फेसबुक अकाउंट हॅक करतो. फिशिंगचा वापर करून गोपनीय माहिती चोरणे बेकायदा असून दंडनीय अपराध आहे.

कीलॉगर म्हणजे काय ?

हॅकर्स विविध सॉफ्टवेअर तसेच फोटोंमधून या प्रोग्रॅमचा प्रसार करतात. हा प्रोग्रॅम यूजरच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल झाल्यानंतर यूजर्सचे सर्व डिटेल्स रिकॉर्ड करतो. यूजर्सचे हे डिटेल्स हॅकर्सला ईमेल पत्त्यावर पाठविले जातात.

अकाउंट हॅक होण्यापासून कसे वाचाल?

फेसबुक लॉगिन केल्यावर होमपेजच्या उजव्या बाजूच्या सेटिंग्जवर क्लिक करा. General, Security and Login, Privacy, Timeline and Tagging Ago options असतील. तिथे Security and Login वर क्लिक कराSetting Up Extra Security या पर्यायात असणार्‍याUse two-factor authentication वर क्लिक करा. तिथे तुमचा मोबाइल नंबर टाका ज्यावर फेसबुक लॉगिन करताना एक ओटीपी येईल.तो कोड आणि तुमचा फेसबुकचा पासवर्ड हे दोन्ही वापरूनच तुम्ही फेसबुक लॉगिन करू शकाल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com