बिटको रुग्णालयाचा विषय गांभीर्याने घ्या

नाशिकरोड प्रभाग सभेत सर्व नगरसेवकांचा एल्गार
बिटको रुग्णालयाचा विषय गांभीर्याने घ्या

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड Nashikroad प्रभाग सभा समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सर्वच नगरसेवकांनी बिटको हॉस्पिटलचा Bytco Hospital विषय चर्चेत घेतला. बिटको हॉस्पिटलमध्ये येणार वर्ग हा गरीब कुटुबांतला वर्ग असून या सर्व रुग्णांची हेळसांड होते आहे विशेषतः गर्भवती महिलांना याचा त्रास सहन करावा लागतोय लॅब टेक्निशियन या चाचण्या येथे होत नाही असे सांगून त्यांना खासगी लॅब मधून रक्त चाचण्या करण्यास सांगत असल्याने रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागतोय.

तसेच लॅब टेक्निशियन हे उपस्थित नसतात, त्यांना चोवीस तास थांबण्याची सक्ती करावी. बिटको हॉस्पिटलमध्ये माफक दरात सुविधा असताना हे लॅबसाठी आलेल्या रुग्णांना परतवून का लावत आहे असा गंभीर आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. त्यावर सभापती दिवे यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारत लॅब संबंधित विचारणा केली व त्याला कोणी अधिकार दिले रुग्णांची जर हेळसांड होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.

लॅबचे अग्रीमेंटमध्ये असे कुटलेही नियम नाहीत, रुग्णांना सेवा देणे बंधनकारक आहे व कुठलाही ज्यादा दर आकारण्याची परवानगी नाही, तरी असा यॉर्कर होत असेल तर तो निंदनीय आहे, याबाबत कुठवर निर्णय घेऊन शासन करण्यात येईल, असे दिवे यांनी सांगितले.

याचबरोबर सूर्यकांत लवटे यांनी प्रभागातील कचरा नियमित उचलला नात नसल्याचा जाब विचारला अनेक ठिकाणी कचरा पडून आहे, यामुळे रोगराईस निमंत्रण मिळत आहे. हॉटेलचा कचरा नियमित उचलला जातो परंतु प्रभागातील कचरा उचलण्यास दिरंगाई का असा सवाल स्वच्छता विभागास केला.

त्याचबरोबर सुनील गोडसे यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय गॅस पाईपलाईन मुळे खड्डे खोदून ठेवले मात्र ते बुजवणार कोण बांधकाम विभागास तक्रार केली मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ते याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचून संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारला. यावेळी प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार, शरद मोरे, पंडित आवारे, संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, सुनील गोडसे, नगरसेविका ज्योती खोले, जयश्री खर्जुल, मीराबाई हाडगे, सुमन सातभाई, सुनीता कोठुळे मंगल आढाव, प्रभारी विभागीय अधिकारी नीलेश साळी, नाशिकरोड महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com