एमपीएससी
एमपीएससी
नाशिक

एमपीएससीच्या मुख्य परीक्षा ‘ऑफलाईन’ घ्या..

स्पर्धा परीक्षांर्थींची मागणी

Bharat Pagare

नाशिक | Nashik

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, संयुक्त गट-ब व संयुक्त गट-क मुख्य परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासह गट-अ ते-ड पर्यंतची सर्व पदे एमपीएससीकडूनच ऑफलाइन भरली जावी, अशी प्रमुख मागणी नाशिक येथील एमपीएससी कृती समितीच्या परीक्षार्थींनी केली अाहे. याबाबत राज्य शासन, आयाेग व स्थानिक लाेकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ही महाराष्ट्रातील सर्वोच्च अशी संवैधानिक संस्था आहे. एक जबाबदार घटनात्मक संस्था म्हणून आजपर्यंत पारदर्शी, तत्पर व कार्यक्षमपणे पदभरतीचे काम करते अाहे. मात्र, प्रस्तावित राज्यसेवा, संयुक्त गट -ब व गट -क मुख्य परीक्षा ऑनलाईन न घेता पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात. २०१७ - २०१९ या कालावधीत महापरिक्षा पोर्टलमार्फत ऑनलाईन परीक्षा पद्धती राबविण्यात आली.

या प्रणालीमध्ये खाजगी कंपनीला कंत्राट दिल्यामुळे परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, तत्परता आणि विश्वसनीयतेचा अभाव दिसून आल्याचे या परीक्षार्थींनी म्हटले आहे. यात मध्ये डमी उमेदवार बसविणे, मास कॉपी करणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, खाजगी कॉम्प्युटर केंद्र परीक्षा केंद्राची नेमणूक, नेटवर्कच्या समस्येमुळे कॉम्प्युटर बंद पडणे, अशा नानाविध समस्यांना सामोरे जावे लागले हाेते. त्यामुळे परीक्षा आॅफलाईनच घ्यावा, अशी मागणी

एमपीएससी कृती समिती, नाशिकचे अजित देशमुख, ज्ञानेश्वर घोटेकर, अमित खेरूडकर, रवी गायकवाड व प्रशांत ताकाटे यांनी केली आहे.

हे आहेत मुद्दे

*ऑफलाईन माेडमध्ये कार्बनप्रत मिळत असल्याने विद्यार्थ्यांकडे त्याबाबतचा पुरावा मिळतो , परंतु ऑनलाईन माेडमध्ये पुरावा मिळणार नाही.

*परीक्षेदरम्यान कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल.

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजपर्यंत ऑफलाईन परीक्षा पद्धतीची सवय असल्याने जर अचानकपणे ऑनलाईन परीक्षा पद्धत राबविली तर ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार.

*आजपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून कागदी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेवर सराव करून अभ्यास केला आहे. आता अचानक ऑनलाईन परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांची धांदल उडण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com