
निफाड। प्रतिनिधी | Niphad
समर्थ महिला शिक्षक सह. पतसंस्थेने स्वमालकीची इमारत उभी करून अल्पावधीतच गरूडझेप घेतली आहे. दरवर्षी शिक्षक (teachers) पाल्य, आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक (Retired teacher) यांचा सत्कार आयोजित करून संस्थेने समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी केले आहे.
येथील समर्थ महिला शिक्षक सह. पतसंस्थेच्या स्वमालकीचे पी.एम. प्लाझा मधील समर्थ शिक्षक भवन (Samarth Shikshak Bhavan) या नवीन वास्तूचे उद्घाटन स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधत आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते व जि.प. माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, पंढरीनाथ थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वैनतेय विद्यालयाचे विश्वस्त वि.दा. व्यवहारे, जि.प. चे माजी सभापती राजेंद्र मोगल, पं.स. चे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, मा.जि.प. सदस्य हरिश्चंद्र भवर, पं.स. चे माजी सभापती सुभाष कराड, शिवा सुरासे, नैताळे माजी सरपंच राजेंद्र बोरगुडे, नवनाथ बोरगुडे,
निफाड (niphad) च्या नगराध्यक्षा रुपाली रंधवे, नगरसेवक सागर कुंदे, शिक्षक समितीचे राज्यनेते काळू बोरसे, राज्य कार्याध्यक्ष केदू देशमाने, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. बनकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना (students) ज्ञानदानाचे काम करतांनाच त्यांचे सहकार्यांना तत्पर कर्जपुरवठा (Loan supply) व्हावा यासाठी पतसंस्थेची निर्मिती करण्याबरोबरच तिला उर्जितावस्थेत आणण्याचे काम केले आहे. आज सहकाराची अवस्था बिकट असतांनाही पांडूरंग कर्डीले व त्यांच्या सहकार्यांनी लावलेल्या या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी जि.प. चे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर म्हणाले की, श्री स्वामी समर्थ ग्रुप व प्राथमिक शिक्षक समिती (Primary Teachers Committee) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व गुणवंत शिक्षक, उपक्रमशील शाळा पुरस्कार (School Awards), सेेवानिवृत्तांचा सत्कार (Retirement felicitation), रक्तदान शिबिरे (Blood donation camps) आदी विविध कार्यक्रम गेली 18 वर्ष सुरूच ठेवून दिपस्तंभासारखे कार्य सुरू ठेवले आहे. कुठल्याही कारणाने या कार्यक्रमात खंड पडला नाही. जिद्द, चिकाटी आणि मेहनत यामुळे हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी शिक्षक समितीचे पदाधिकारी व समर्थ महिला शिक्षक पतसंस्थेचे मंडळ नेहमीच तत्पर असल्याचेे क्षिरसागर म्हणाले. यावेळी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष पांडूरंग कर्डीले यांनी शिक्षक पतसंस्थेच्या व संघटनेच्या प्रगतीचा आढावा मांडला.
यावेळी वि.दा. व्यवहारे यांचे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त हितगुज संपन्न झाले. याप्रसंगी समर्थ पतसंस्थेच्या चेअरमन मनिषा कर्डीले, व्हा. चेअरमन संजीवनी देशमुख, कार्यवाह सुशिला सोनवणे, बँक प्रतिनिधी दत्तू सानप, संचालक अवंतिका गोसावी, अरुणा पुंड, ज्ञानेश्वरी चव्हाणके, स्मिता सुडके, सुनीता किट्टे, सरिता येवले, विजया नवसारे, रत्ना गायकवाड, अनिता दरेकर, निर्मला शिंदे, लिपिका अर्चना वैद्य यांचेसह शिक्षक समितीचे अनंत गोसावी, रविंद्र चव्हाणके, रमेश गांगुर्डे, उत्तम सोनवणे, संजय बैरागी, दत्तू निफाडे, राजेंद्र पवार, अविनाश बागडे, संजय गवळी आदींसह शिक्षक उपस्थित होते.