आत्मविश्वासाने परिक्षेला सामारे जा : वाजे

आत्मविश्वासाने परिक्षेला सामारे जा : वाजे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

येणार्‍या दहावीच्या परिक्षेला (SSC Exam) आत्मविश्वासाने (confidence) सामोरे जा. गुणवत्तेच्या जोरावर यशाला गवसणी घाला. आयुष्याला वळण देणार्‍या या परिक्षेला भविष्याच्या दृष्टीने महत्व असल्याचे प्रतिपादन मविप्र संचालक हेमंत वाजे (MVP Director Hemant Waje) यांनी केले.

लोकनेते वाजे विद्यालयातील नुकताच 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी उद्योजक अनिल कुंदे (Entrepreneur Anil Kunde) होते. भावी काळात स्वतः पैसे कमवायला लागल्यानंतर आई-वडिलांना विसरू नका, त्यांची सेवा करा, तुमच्या बालपणात त्यांनी तुम्हाला सांभाळले, संस्कार केले, शिक्षण दिले, तुमच्या पायावर उभे केले. त्यामुळे वृध्दापकाळात त्यांचा सांभाळ करणं हे तुमचे कर्तव्य असल्याचे वाजे म्हणाले.

कुंदे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांना (students) सोबत घेऊन शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ (Headmaster Bhausaheb Kahandal) यांनी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपमुख्याध्यापिका के. आर. रहाणे, पर्यवेक्षिका पी. डी. जाधव, पर्यवेक्षक व्ही. एन. शिंदे, अभिनवचे मुख्याध्यापक अविनाश साळुंखे, अर्जुन कासार, रामदास वाजे,शांताराम चांदोरे, ज्ञानदेव नवले, मनीषा बनकर, रमेश तुंगार उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com