नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन २०२०-२०२१ कर्ज वसुली हंगाम (दि. १) नोव्हेंबर पासून सुरु झालेला आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली व्हावी,यासाठी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विभागीय अधिकारी यांची वसुलीबाबत आढावा बैठक घेतली.

कर्जवसुलीसाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदावर सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्यास आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने बँकेच्या केंद्र कार्यालयातील अधिकारी, सेवकांना तालुकास्तरावर पाठवून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम १५६ प्राप्त अधिकारानुसार थकबाकीदार सभासदांचे १०१ची प्रकरणे दाखल करणे, वसुलीबाबत कायदेशीर नोटीस देणे तालुका निहाय मोठे २० थकबाकीदारांच्या याद्या तयार करून कलम १०७ अन्वये जप्ती आदेशानुसार नोदिची कारवाई करणे, सबंधीत थकबाकीदाराचे अपसेट प्राईज (मुल्यांकन) प्रकरणे तयार करून मोठे स्थावर लिलाव प्रक्रिया राबविणे मोठे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदाराकडून वसुली करण्याचे आदेश अध्यक्ष आहेर यांनी यावेळी दिले.

बँकने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० सदर योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे.या योजनेत भाग घेणाऱ्या कर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर ५० टक्के सवलत (योजनेच्या मुळ अटी नुसार) किंवा जास्तीत जास्त रुपये ४.५० लाखा पर्यंत सवलत थकबाकीदार सभासदांनी देण्यात येत आहे. आजपावेतो सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० योजनेत १३५५ सभासदांनी भाग घेऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे.

भरघोस सवलतीचा लाभ घ्यावा जिह्यातील जास्तीत जास्त योजनेस पात्र थकबाकीदार सभासदांनी या योजनेत भाग घेऊन कर्ज परतफेड करताना भरघोस सवलतीचा लाभ घेऊन पुनश्च कर्ज मिळविण्यासाठी पात्र व्हावे व जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस व संस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदा आहेर व संचालक मंडळा तर्फे करण्यात आलेले आहे.