इघे हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा - फडणवीस

इघे हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा - फडणवीस

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सातपूर येथे युनियनच्या वादातून भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे याची हत्या करण्यात आली होती Murder of Amol Ighe . या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Former Chief Minister Devendera Fadnavis यांनी काल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आरोपीचे साथीदारांना अटक करावी, तपास फास्ट ट्रॅकवर Fast Track करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.

कंपनीतील 95 टक्के लोक अमोलच्या सोबत होते. मात्र त्याच्या खुनानंतरही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांची पत्नी व परिवाराने व्यक्त केली. आरोपीचे साथीदार अद्याप मोकाट असल्याने त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी कुटुंबीयांनी केली. आरोपीने वापरलेले हत्यारही पोलिसांना मिळू शकलेले नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. अद्यापही इघे कुटुंबाला योग्य न्याय मिळालेला नाही. अजूनही आरोपी बाहेर फिरत आहेत. त्यांनाही अटक झाली पाहिजे, फास्ट टॅ्रकवर ही केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत याचा पाठपुरावा करून अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचे कुटुंबाचे सांत्वन करताना फडणवीस म्हणाले. जोपर्यंत उर्वरित आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पिच्छा सोडणार नसल्याचे आश्वासनही यांनी दिले.

कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, माजी मंत्री जयकुमार रावल, गिरीष महाजन, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेवक दिनकर पाटील, जगन पाटील, रामहरी संभेराव, महेंद्र शिंदे, अमोल पाटील, संदीप तांबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com