करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

सेवकांच्या आरोग्याची काळजी घ्या : आ. हिरे

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Satpur

कारखान्यांची चाके फिरू लागली असली तरी गेल्या ८-१५ दिवसांत नाशिक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अनेक सेवकांना नाहक जीवदेखील गमवावे लागले आहेत. बहुतांश कारखान्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास येत असल्याने आ. सीमा हिरे यांनी पत्राद्वारे कारखान्यात करोना महामारीचा संसर्ग होऊ नये याकरिता कामगारांची जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे कळवले आहे.

औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांमध्ये करोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने कंपन्यांनी सेवकांची योग्य काळजी घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीवालाच संपूर्ण देशात अनलॉकच्या निर्णयानंतर राज्य शासनाने ३१ जूनपासून कारखाने व काही व्यवसायांना संचारबंदीतून सूट देऊन उद्योग सुरू करण्यास अटी-शर्तींवर परवानगी दिली.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित फार्मा कंपनीत १३ तर इगतपुरी गोंदे येथील तीन कंपन्यांमध्ये शेकडो तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये रुग्ण आढळून आल्याने औद्योगिक क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगार व्यवस्थापन तसेच कामगार उपायुक्त यांनी कामगारांची जास्तीत जास्त काळजी घेण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी भावनिक साद या पत्राद्वारे घालण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com