पाळीव जीवलगांची काळजी घ्या!

पाळीव जीवलगांची काळजी घ्या!

नाशिक । डॉ. सचिन वेंदे, डॉ.नम्रता मोहरे Nashik | Dr. Sachin Vende, Dr. Namratā Mohare

उन्हाळ्यात ( Summer Season )साधारणपणे पाळीव प्राणी निर्जळीकरण (Dehydration) आणि उष्माघात Heat Stroke) यामुळे ग्रस्त असतात. तो कसा ओळखावा? तर लाळ गळण्याचे प्रमाण जास्त होते. श्वास घेण्याचे आणि धाप टाकण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले दिसून येते. उष्माघात झाल्यास त्यांना उलटी व जुलाब यासारखे त्रासदेखील होतात. प्राण्यांमध्ये थकवा जाणून येतो, भूक मंदावते. .

पाळीव कुत्र्यांना दिवसातून दोनदा तरी फिरायला न्यावे. उन्हाळ्यात साधारणपणे त्यांना सकाळी लवकर किंवा कोवळ्या उन्हात तसेच सायंकाळी जेव्हा ऊन कमी होते तेव्हा फिरायला न्यावे. जेणेकरून त्यांना ऊन लागून बाकीचे त्रास होणार नाहीत.

वाढत्या उन्हामुळे प्राण्यांची भूक मंदावते. काहींच्या अंगावर पुरळ येते. थकवा आल्यामुळे प्राणी शांत बसतात. उलटी, जुलाब होत असतील तर वशहूवीरींळेप दिसून येते.

याकाळात त्यांची घरी कशी काळजी घ्यावी असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. उन्हाळ्यात प्राण्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण 20-30 टक्क्यांनी वाढलेले असते. त्यामुळे त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे. पाण्यात जठड पावडर तसेच लिवर टॉनिक त्यांना ते पाणी प्यायला द्यावे. जेणेकरून त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. थंड हवेच्या ठिकाणी त्यांना बसवावे. याकाळात उलटी, जुलाब यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात दाखवावे.

जेणेकरून नंतर होणार्‍या विपरीत परिणामांना प्राण्यांना सामोरे जावे लागणार नाही. साधारणपणे प्राण्यांना आठवड्यातून कोमट पाण्याने एकदाच अंघोळ घालावी. जर प्राण्यांना बुरशीजन्य संसर्ग (fungal infection) असेल तर आठवड्यातून दोन वेळा आंंघोळ घालावी. त्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळे शाम्पू तसेच साबणसुद्धा मिळतात. जर निर्जलीकरणसारखा त्रास होत असेल तर ORS powder पाण्यात टाकून त्यांना प्यायला द्यावे.

काही औषधे कॉमन असतात. ती घरात ठेवली तरी चालतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध प्राण्यांना परस्पर देऊ नये. कारण गरजेपेक्षा जास्त औषध त्यांच्या पोटात गेल्यास त्याचे दुष्परिणाम प्राण्यांच्या शरीरावर दिसून येतात. याकाळात अंगावर पुरळ किंवा अन्य रॅश येऊ शकते. अशावेळी काय करावे? अंगावर पुरळ किंवा ीरीह दिसत असल्यास घरगुती उपचार म्हणून त्यावर आपण तूप लावू शकतो.

जेणेकरून त्यांना त्या भागामधे थंड वाटून थोडा आराम मिळेल. तसेच Kiskin lotion सारखे लोशन बाजारात उपलब्ध आहेत. ते आपण त्यावर लावू शकतो. उन्हाळ्यात हिटस्ट्रोकमुळे मोठ्या प्रमाणात श्वान, मांजरी आजारी पडत आहेत. अनेक जातींच्या श्वानांना व मांजरांना मोठ्या प्रमाणात केस असतात. उन्हाळ्यात त्यांच्या शरीराचे तापमान सुस्थितीत ठेवण्यासाठी केस गळती होत असते. यामुळे उन्हाळ्यात जर हे केस काढून टाकले तर उत्तम राहील. पाळीव प्राण्यांना बोलता येत नाही. त्यामुळेच त्यांच्या भावना समजावून घेऊन त्यांची काळजी घ्यायला हवी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com