उन्हात पशुधनाची काळजी घ्या : डॉ. अहिरे

उन्हात पशुधनाची काळजी घ्या : डॉ. अहिरे

चांदोरी। वार्ताहर | Chandori

उन्हाचा पारा चांगला वाढत असताना पशुपालकांनी (pastoralists) पशुधनाची (Livestock) योग्य काळजी न घेतल्यास ते आजारी पडू शकतात. किंबहुना अति उष्मघात झाल्यास मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जनावरांना अतिउष्मघात किंवा उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आपली जनावरे तीव्र उन्हात मोकाट सोडू नये. त्यांना गोठ्यातच ठेऊन योग्य संतुलित आहार (Balanced diet) व मुबलक स्वच्छ पाणी (Clean water) उपलब्ध करून देणे फायदेशीर राहील असे प्रतिपादन निफाडचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनील अहिरे (Niphad Animal Husbandry Officer Dr. Sunil Ahire) यांनी केले आहे. उन्हाळाच्या झळांचा जनावरांना त्रास होऊ नये यासाठी जनावरांच्या अंगावर दिवसातून तीन ते चार वेळा थंड पाणी (cold water) टाकावे. तसेच थंड पाणी कमीत कमी चार ते पाच वेळा पाजावे. नियमित हिरवा चारा, खनिजे मिश्रण संतुलित आहार द्यावा.

उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराची झीज व वजनात झपाट्याने घट होते. ज्या जनावरांची झीज होईल त्यांचे वजन पावसाळ्यात संतुलित आहाराने भरून निघेल व त्यांची प्रजनन प्रक्रिया लवकर सुरू होईल. तापमान 34 अंशा पेक्षा जास्त असल्याने जनावरांना अतिरिक्त ताण पडून वेगवेगळ्या रोगांचा प्रतिकार करावा लागतो. उन्हाळ्यात जसजसे बाह्य वातावरणातील तापमान (Temperature) वाढते तसतसे जनावरांच्या शरीराची तापमान सहन करण्याची शक्ती कमी होत जाते.

अशा वातावरणात शारीरिक तापमान एकाएकी वाढून म्हणजे 104 ते 105 अंशा च्या वर गेल्यावर जनावरांच्या श्वासोश्वास, हृदयक्रिया अधिक तीव्र होतात, लघवीचे प्रमाण कमी होते. शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते व रक्तदाब देखील कमी होतो. या दिवसात हिरव्या चार्‍यामुळे जनावरांना अशक्तपणा, तोंड कोरडे पडणे, दूध कमी देणे आदी प्रकारच्या समस्या जनावरांना जाणवतात. योग्य औषधे उपचार व लसीकरण करून या समस्यांना आळा घालणे शक्य असल्याचे डॉ.सुनील अहिरे यांनी म्हटले आहे.

जनावरांना होणारे आजार

सनस्ट्रोक उष्मघातात जनावरांना हगवण लागणे, मांसपेशी थरथर कापणे, भोवळ येणे, दूध न देणे आदी आजार होतात. त्वरित उपचार न केल्यास जनावरे दगावू शकतात. नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो, कडाक्याच्या उन्हाने कातडीचा रोग उद्भवू शकतो तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

Related Stories

No stories found.