प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्या

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्या

कोहोर । वार्ताहर Kohore

गर्भवती महिलेला (Pregnant Woman) सकस आहार (Healthy Diet) घेण्यास प्रोत्साहित करून जन्माला येणार्‍या नवजात बालकाचेही आरोग्य (Health) सुधारण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना (Pradhanmantri Matruvandana Yojana) पेठ (Peth) तालुक्यासह नाशिक (Nashik) जिल्ह्यात राबवली जात आहे. यात गर्भवतीसह कुटुंबियांचे प्रबोधन केले जाते.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जातात. पहिला टप्पा 1000 रुपये, दुसरा टप्पा 2000 रुपये आणि तिसरा टप्पा 2000 रुपये याप्रमाणे मातेच्या बँक खात्यावर (Bank Account) जमा होतात.

पंतप्रधान मातृवंदना योजना केंद्रस्तरावर राबवली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत उपकेंद्र कोपुर्ली खुर्द कार्यक्षेत्रांतर्गत पहिल्या गर्भवती मातांनी लाभ घेतला आहे. तसेच पुढील काळात जास्तीत जास्त लाभार्थी महिलांनी या योजनेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य उपकेंद्र (Health Subcentre) कोपुर्ली खुर्दचे आरोग्यसेवक (Health worker) किसन ठाकरे यांनी केले आहे.

पात्रतेचे निकष काय ?

पहिल्या अपत्यासाठी हा लाभ मिळणार आहे. त्यासाठी गर्भवती मातेचे, पतीचे आधारकार्ड, मातेचा बँक खाते नंबर व आरोग्य केंद्रात नोंदवलेले नोंदणी कार्ड आवश्यक आहे.

लाभासाठी कोठे करायचा संपर्क?

गर्भवती महिलांनी आपल्या जवळच्या शासकीय यंत्रणेत आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या उपकेंद्र, आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात जावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com