पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया योजना अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवा

खा. गोडसे यांचे आवाहन
पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया योजना अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवा

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

कांद्यासह इतर शेतीमाल उद्योगांना चालना मिळण्यासाठी केंद्राने पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया (Prime Minister Micro Food Processing Enterprises Scheme) कार्यान्वित केली आहे...

यात कर्जासह अनुदाचा समावेश आहे. वैयक्तिक व उत्पादक कंपनी तसेच बचत गटांना याचा लाभ होणार असल्याने ही योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केले.

केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांच्या (Farmers) उन्नतीसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, योजना देशपातळीवर सुरु केली आहे.

त्याची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचलेली नाही. याची दखल घेवून खा. गोडसे यांनी कृषि विभागाच्या (Agriculture Department) माध्यमातून 'आत्मा' प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात विशेष बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रकल्प संचालक राजेंद्र निकम (Rajendra Nikam) यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, ॲग्रीकल्चर इन्फ्राट्रक्चर फंड, इतर योजनांच्या माहितीचे सादरीकरण केले. 'एक जिल्हा एक पीक' या धोरणांतर्गत केंद्र शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेसाठी कांदा पिकाची निवड केलेली आहे.

असंघटीत उद्योजकांना एकत्रित आणणे, उत्पादनाचा ब्रँड विकसित करून उत्तम विक्री व्यवस्थापन करणे, सामाईक सेवा उपलब्ध करुन देणे, स्वंयम सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमीत कमीत व्याजदरात कर्ज पुरवठा व कर्जावर भरघोस सबसीडीची माहिती त्यांनी दिली.

या योजनेसाठी केंद्र ६० तर राज्य शासन (State government) ४० टक्के निधी उपलब्ध करुन देणार आहे. याचा लाभ प्राधान्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असून योजनेचा फायदा ओडीओपी मधील इतरही शेती उत्पादनाला मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी यावेळी काही विशेष सूचना मांडल्या. यात ओडीओपी (ODOP) मध्ये इतर पिकांचा समावेश करावा, शेतीमाल उत्पादनाच्या निगडीत असलेल्या कंपनींनादेखील या योजनेचा लाभ मिळावा, योजनेद्वारे तातडीने कर्ज मिळण्यासाठी बँकांना सूचना कराव्यात, कर्जाची प्रक्रिया साधी व सोपी असावी, योजनेतील त्रुटी दूर कराव्यात, योजनेचा प्रचार व प्रसारासाठी तालुका पातळीवर विशेष बैठका घ्याव्यात, कांद्याचा शॉर्टिंग, ट्रेडिंग व साठवण याचा योजनेत समावेश करावा.

यावेळी कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, नाबार्डचे अमोल लोहकरे, बाळासाहेब वाघ, अनिल ढिकले, तानाजी गायकर यांच्यासह कृषि अधिकारी, कांदा उत्पादक उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नसल्याने योजना यशस्वी होत नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना अत्यंत महत्वाची असून प्रशासनाने ती शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावी.

- खा. हेमंत गोडसे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com