स्वयंरोजगार निर्मीतीसाठी औद्योगिक सवलतींचा लाभ घ्यावा - डॉ. कुंवर

स्वयंरोजगार निर्मीतीसाठी औद्योगिक सवलतींचा लाभ घ्यावा - डॉ. कुंवर

देवळा । प्रतिनिधी Deola

यशस्वी उद्योजक (Successful Entrepreneur)होण्यासाठी आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागीय औद्योगिक वसाहत (Nashik Divisional Industrial Estate) संघाचे अध्यक्ष डॉ. किशोर कुंवर ( Dr. Kishor Kuvar) यांनी केले. महाराष्ट्र शासनाने महिला व अनुसूचित जाती-जमातींमध्ये उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण जाहीर केले असून त्यात अनेक सोयी सवलती देण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिकद्वारा देवळा येथे कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात अनुसूचित जाती प्रवर्गातील स्वयंसहाय्यता युवा गटांसाठी एक महिना नि:शुल्क अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी डॉ. कुंवर बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी संजय भामरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर कुवर यांचे बार्टी नाशिकच्या प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रकल्प अधिकारी दाभाडे यांनी बार्टीच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त गरजू महिला व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी रोजगार व स्वयंरोजगार निर्मीतीसाठी उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी भामरे यांनी सांगितले की, कळवण, देवळा, सटाणा, चांदवड व मालेगाव परिसरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सोयीचे असल्याने देवळा येथे प्रशिक्षण केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणात उद्योजक होण्यासाठी आवश्यक विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थींची मुलाखत घेण्यात आली. यावेळी समतादूत शिवाजी चौरे, शुद्योधन तायडे, विशाल पोटींदे, उज्ज्वला बच्छाव आदिंसह महिला व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com