शासन योजनांचा लाभ घ्या

शासन योजनांचा लाभ घ्या

आमदार दिलीप बनकर यांनी केले आवाहन

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Baswant

महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) वतीने सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या (Golden Jubilee Independence Year) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांना (Farmers) डिजिटल सातबारा उतारा (Digital Satbara Utara) घरपोच देण्याचे शासनाने ठरविले आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकरी घ्यावा असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील बाजार समितीत आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्या हस्ते शेतकर्‍यांना डिजिटल सातबारा उतारा वाटपप्रसंगी आ. बनकर बोलत होते. सातबारा हा शेतकर्‍यांचा महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे या उतार्‍यातील पूर्ण नोंदी, त्यातील त्रुटी प्रत्येक शेतकर्‍याने तपासणे गरजेचे आहे. उतार्‍याबाबत काही अडचण असल्यास तहसीलदार (Tahsildar), मंडल अधिकारी, कामगार तलाठी यांचेशी संपर्क साधून आपला सातबारा उतारा व्यवस्थित करून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी आमदार बनकर यांनी केले.

याप्रसंगी निफाडच्या (Niphad) प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे (Prantadhikari Dr. Archana Pathare), तहसीलदार शरद घोरपडे, बाळासाहेब बनकर, संपत विधाते, माधव ढोमसे, नारायण पोटे, सचिव बाळासाहेब बाजारे उपस्थित होते. आमदार बनकर यांच्या हस्ते पंधरा गावातील शेतकर्‍यांना प्रातिनिधिक स्वरूपात डिजिटल सातबारा खाते उतारे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांत डॉ. अर्चना पठारे म्हणाल्या की, सर्व शेतकर्‍यांना मोफत सातबारा घरपोच करण्यात येणार आहे.

सातबारा हा अत्यंत महत्त्वाचा महसूल दस्तऐवज आहे. त्याच्यावरच्या सर्व नोंदींची काटेकोरपणे तपासणी करणे, नवीन नोंदी अपडेट ठेवणे आपली जबाबदारी आहे. यावेळी जमिनीच्या पोटखराबा संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले. उतार्‍यातील अनेक त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकर्‍यांनी डिजिटल सातबारा उतारा यातील त्रुटींच्या संदर्भात त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी नीलकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव आदींसह पंधरा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.