आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या 'त्या' महिलेवर कारवाई करा: आदिवासी विकास परिषद

आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या 'त्या' महिलेवर कारवाई करा: आदिवासी विकास परिषद

पेठ । प्रतिनिधी | Peth

आदिवासी समाज (tribal community) बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्याप्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (Akhil Bharatiya Adivasi Vikas Parishad) व रावण ग्रुप फाऊंडेशन, पेठ (Ravana Group Foundation, Peth) यांच्यातर्फे

आयुषी शर्मा ह्या स्त्री विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कारवाई (Scheduled Castes and Scheduled Tribes Prevention Action) करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा कार्यध्यक्ष गणेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पेठचे पोलीस उपनिरीक्षक कपिले (Peth police sub-inspector Kapile) यांना निवेदन (memorandum) देण्यात आले.

आदिवासी समाजाबद्दल सोशल मीडिया (social media) वर आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) करणारी आयुषी शर्मा नामक स्त्रीवर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत अट्रोसिटी (Atrocity) गुन्हा दाखल व्हावा व सदर असे वक्तव्य कोणी परत करणार नाही, यासाठी कडक कायदा करावा म्हणजे परत कोणी असे करणार नाही. त्याचबरोबर समाजात जो असंतोष निर्माण झाला यामुळे सदर तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनाद्वार तालुका सचिव योगेश भांगरे, हातरुडी सरपंच भाऊराव सातपुते, बिरसा क्रांती दल जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पाडवी रावण, जिल्हाध्यक्ष विक्रम गायकवाड, कार्यध्यक्ष राजेश जाधव, सरचिटणीस किरण खांबाईत, लक्ष्मण शिंगाडे सदस्य, रवी गागोडे, संतोष पवार आदींसह आदिवासी समाज बांधवांच्या संह्या आहेत.

Related Stories

No stories found.