लेंडी खताची अनधिकृत विक्री करणार्‍यांवर कारवाई करा

लेंडी खताची अनधिकृत विक्री करणार्‍यांवर कारवाई करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक वनविभागाच्या येवला तालुक्यातील मौजे ममदापूर येथील राखीव वनक्षेत्रातील लेंडी खताची अनधिकृतरीत्या वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी विक्री केल्याचा आरोप मराठा मावळ संघट्नेने केला आहे...

याप्रकरणी संघट्नेने मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्याकडे निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लेंडी खत विक्री प्रकरणातील संबंधितांवर कारवाई न केल्यास दि.२८ जूनपासून वनविभागाच्या हद्दीत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित वन कर्मचार्‍यांची चौकशी करून कारवाईची मागणी ममदापूर येथील मराठा मावळा संघटनेने निवेदनाद्वारे केली.

वनकर्मचार्‍यांच्या लेंडी खत विक्रीबाबत मे महिन्यात झालेल्या ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली. या प्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. वनविभागाकडून संबंधित वन कर्मचार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वनविभाग दोषी वन कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी खत विक्रीचे प्रकरण दाबत असल्याचा आरोप मराठा मावळा संघटनेने केला आहे. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रदीप दवंगे, जिल्हाध्यक्ष देवीदास गुडघे-पाटील, नाशिक शहराध्यक्ष स्वप्नील चव्हाण, कार्याध्यक्ष राकेश वाडिले आदींनी ही मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com