रोलेट चालविणार्‍यांवर कारवाई करा - विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

रोलेट चालविणार्‍यांवर कारवाई करा - विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात जुगार्‍यांनी मोबाईलवरून ऑनलाईन रौलेट बिंगो (Online Roulette Bingo )खेळण्याचे तंत्रज्ञान अवगत केल्याने हा प्रकार रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़ त्यामुळे रोलेट गेम चालविणार्‍यांवर कारवाई करा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jhirwal )यांनी दिल्या.

यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होत असून विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांना या जुगाराच्या खेळातून गंडवले गेल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. याची तातडीने दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुंबईत विधानभवन येथे गृहविभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील ( Rural Superintendent of Police Sachin Patil ), सायबर क्राईम तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत फास्ट ट्रॅक बैठक बोलावली होती.

यावेळी नरहरी झिरवाळ यांनी गृहविभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय आणि नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना या प्रकरणातील सूत्रधारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी येत्या आठवड्यात ऑनलाईन रौलेट जुगाराचा मुख्य सूत्रधार पकडला जाणार असल्याची माहिती दिली. येत्या चार महिन्यांत या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावण्यात येईल, अशी ग्वाही देत सर्व आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 420 आणि मोक्काअंतर्गत शिक्षा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ऑनलाईन रौलेट रॅकेटचा नाशिकमधील सुपर डिलर कैलाश शाह याला पुन्हा एकदा पकडण्याची सर्व पुराव्यानिशी तयारी झाली असल्याची माहिती े तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत आहे. फसवणूक झाल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाचा कडक अंकुश असण्याची गरज व्यक्त केली आणि गरज पडल्यास कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याविषयी विचार करता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर भोईर आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे बैठक लावण्याची विनंती केली होती.

Related Stories

No stories found.