
नाशिक रोड । प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक शहर (nashik city) परिसरात बेकायदेशीररित्या नायलॉन मांजाचा (Nylon Manja) सर्रास विक्री होत आहे. नायलॉन मांजा अतिशय घातक असून त्याचे दुष्परिणाम याआधी प्रत्येक समाजघटकाने अनुभवले आहेत.
त्यामुळे जो कोणी नायलॉन मांजाची (Nylon Manja) बेकायदेशीर विक्री (Illegal sale) करेल त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group) वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांच्याकडे करण्यात आली. दरवर्षी नायलॉन मांजामुळे मानवासह पक्षी व प्राण्यांना दुखापत होऊन गंभीर जखमी होण्याचे प्रकार घडतात.
याशिवाय विद्युत तारांना नायलॉन मांजाचा (Nylon Manja) स्पर्श झाल्यास शॉर्टसर्किट (short circuit) होऊन अपघात घडण्याचे प्रकार घडत असतात. अशा नायलॉन मांजाच्या वापर व विक्रीवर शासनाने बंदी घालूनदेखील काही समाजविघातक व्यक्तींमार्फत शहरात अनधिकृतपणे नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे समजते. विशेषतः असा नायलॉन मांजा इतर राज्यांतून शहरात विक्रीला येत आहे.
तरी आपणांस या निवेदनाद्वारे (memorandum) विनंती करण्यात येते की, या नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणार्यांवर शासनामार्फत कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपमहानगर प्रमुख योगेश देशमुख, नितीन चिडे, सुनील देवकर, किरण डहाळे, स्वप्निल आवटे, मसूद जिलानी, सागर निकाळे, विकास गीते, अमित भगत आदी उपस्थित होते.