
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जेलरोड (Jail Road) येथील मनपा शाळा (Municipal School) क्र. ५६ मध्ये किरकोळ कारणावरून कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला (student)
शाळेतील शिक्षक (teacher) चंद्रकांत गायकवाड यांनी बेदम मारहाण (beating) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी (Municipal Additional Commissioner Pradeep Chaudhary) यांना निवेदन (memorandum) देऊन करण्यात आली आहे.
मंगळवार (दि.28) रोजी जेलरोड येथील मनपा शाळेत काही विद्यार्थ्यांचे आपसात भांडण सुरु असतांना शाळेतील शिक्षक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे (students) भांडण सोडविण्या ऐवजी विद्यार्थ्यालाच बेदम मारहाण केली.
विशेष म्हणजे मारहाणीचा हा प्रकार शाळेच्या मुख्याद्यापिका यांच्या दालन समोरच घडला. शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी शिक्षक व मुख्याध्यापिका यांना फक्त करणे दाखवा नोटीस दिली असून प्रकरण मिटवले जात असल्याचे संशय व्यक्त होत असल्याचे निवेदन म्हटले आहे.
मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, शशिकांत चौधरी, उमेश भोई, जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, गणेश मोरे आदी उपस्थित होते.