वीज कंपनी ठेकेदाराविरूध्द कारवाई करा: आयुक्त भालचंद्र गोसावी

वीज
वीज

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मनपाची परवानगी न घेता झालेली बेकायदा बांधकामे (Illegal constructions) तसेच अतिक्रमण (Encroachment) करत व्यवसाय करणार्‍यांना मालेगावी वीजपुरवठा कंपनीकडून (Electricity supply company) देण्यात आलेले वीज जोडण्यांमुळेच शहरात अतिक्रमणे वाढली असल्याचे निदर्शनास आल्याने मनपा प्रशासन सतर्क झाले आहे.

शहरातील बेकायदेशीर वीजजोडण्या (Illegal power connections) दिले गेलेल्या सर्व आस्थापनांचे सर्व्हेक्षण (survey) करण्यात येवून वीजकंपनी ठेकेदाराविरूध्द गुन्हा (Offense against contractor) दाखल करावा, असे आदेश प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी (Administrator and Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी दिले आहेत. मनपा प्रशासक पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी संपुर्ण शहरात अतिक्रमण निर्मुलनासाठी धडक मोहिम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

एकाचवेळी चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण (Encroachment) काढण्याची मोहिम वेगवेगळ्या पथकांतर्फे राबवली जात आहे. या धडक मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत अडीच हजारावर अतिक्रमणे काढण्यास पथकांना यश आले आहे. सदर मोहिम सुरू असतांना प्रशासन अधिकार्‍यांना अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत. गटारी (Sewerage), नाल्यांसह मोकळे रस्ते (Road) व भुखंडावर देखील अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. काहींनी चक्क राहते घर बांधले आहे.

यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत असतांना देखील मनपा कायदेशीर मान्यता तसेच शासन व्यवसाय परवानगी आदी कागदपत्रे न तपासता एमपीएसएल (MPSL) या खाजगी वीजपुरवठा (power supply) करणार्‍या कंपनी ठेकेदाराने संबंधित अतिक्रमण धारकांना वीजजोडण्या दिल्याचे निदर्शनास आले आहे.

वीजजोडणी सहजतेने मिळत असल्यामुळेच शहरात बेकायदा बांधकाम, व्यावसायिक अतिक्रमणे वाढण्यास मदत मिळाली असल्याचे दिसून आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त गोसावी यांनी संपुर्ण शहरात ज्या बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या दुकानांना वीज कंपनीतर्फे जोडण्या देण्यात आल्या आहेत अशा सर्व दुकानांचे सर्व्हेक्षण करण्यात येवून वीजकंपनी ठेकेदाराविरूध्द सामुहिक गुन्हा दाखल करण्याचे आदेश विद्युत विभागास दिले आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गिरणा पंम्पींग स्टेशनच्या (Girna Pumping Station) वीजपुरवठ्यासाठी अडचण येवू नये यासाठी महानगरपालिकेने एक्स्प्रेस फिडर घेतला आहे. त्यामुळे 24 तास वीजपुरवठा होत असतो. यासाठी स्वतंत्र वीजबील देखील मनपातर्फे भरले जाते. मात्र अनेकदा या फिडरच्या वीजपुरवठ्यात देखील अडथळे येत असल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. या फिडरच्या वाहिनीवर देखील खाजगी वीजजोडण्या देण्याची चर्चा होत आहे. याबाबत देखील चौकशी करण्याचे आदेश आयुक्त गोसावी यांनी विभागाला दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com