मुख्यालयी न राहणार्‍या अधिकारी, सेवकांवर कारवाई करा

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे आदेश
मुख्यालयी न राहणार्‍या अधिकारी, सेवकांवर कारवाई करा

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या संकटकाळात अनेक अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाच्या विविध मोहिम राबवल्या जात असताना त्यांच्या अंमलबजावणीसाठी गावात ग्रामसेवक, ग्रामस्तरावरील कर्मचारी हे उपस्थित राहत नाहीत.

तसेच पंचायत समिती स्तरावरील कार्यरत गट विकास अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी व तालुकास्तरावरील विभागप्रमुख हे देखील मुख्यालयी हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. कोविड केअर सेंटरवर पर्यवेक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी मुख्यालयी राहण्याची आवश्यकता आहे.

पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याचे बनसोड यांच्या निदर्शनास आल्यामुळे या अधिकार्यांना त्यांनी तंबी दिली असून, जे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहणार नाही, त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com