Video : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावत तहसीलदारांचे धरणे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या प्रलंबित सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे काळ्या फिती लाऊन आज आंदोलन करण्यात आले....(Tahasildar agitation at collector office today)

अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य तहसिलदार (Maharashtra state tahasildar) व नायब तहसिलदार (nayab tahasildar) संघटनेने राज्यातील नायब तहसिलदार, तहसिलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या शासनस्तरावर प्रलंबीत सेवा विषयक बाबी तात्काळ निकाली काढण्यात याव्यात या अनुषंगाने वारंवार निवेदने देवून तसेच बैठकामधुन पाठपुरवा करण्यात आला. परंतु अद्यापही वा विषयक बाबी शासनस्तरावर प्रलंबीत आहेत.

यामध्ये नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे, तहसिलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे. नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करणे.

तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे. नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.

परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.

नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. सेवा निवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तात्काळ निकाली काढणे.

महिला अधिकाऱ्यांचे बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्याने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे.

या सर्व बाबी शासन स्तरावर प्रलंबीत आहेत. नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गाच्या नियमीतीकरण व सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबतच्या प्रस्तावास कोकण, नाशिक व पुणे विभागास मंजुरी मिळाली आहे.

परंतु औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागांचे प्रस्ताव अद्याप शासनास सादर झालेले नाही. त्यामुळे नायब तहसिलदार ते तहसिलदार व तहसिलदार ते उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व सदस्यांची बैठक पार पडली असून उपरोक्त प्रलंबीत बाबींचे निषेधार्थ खालील प्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय नाईलाजास्तव संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी घेतला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जर मागण्यांचा विचार झाला नाही तर आज निवेदन दिले आहे. तसेच आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच पुढील १८ एप्रिलला सर्व सदस्य/ पदाधिकारी रजा टाकून विभागीय आयुक्त यांचे कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच जर या कालावधीतही उपरोक्त नमूद मागण्या मान्य न झाल्यास ०४ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या आंदोलनाद्वारे देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.