'त्या' गुन्हेगारांवर तडीपारचा प्रस्ताव

'त्या' गुन्हेगारांवर तडीपारचा प्रस्ताव

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

शुभम पार्क Shubham Park परिसरात मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनांची व दुकानाची तोडफोड Vandalisam करणाऱ्या चार गुंडांसह एकावर तडीपारीच्या Tadipar कारवाईचा प्रस्ताव अंबड पाेलिस ठाण्याचे Ambad Police Station व.पो.नि. भगीरथ देशमुख Senior Inspector of Police - Bhagirath Deshmukh यांनी दिला.

शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत वैभव रणजित लोखंडे (19 ,रा. रिगल अष्टविनायक बिल्डिंग, फ्लॅट नंबर 15, अंबड ), वैभव गजानन खिरकाडे (28,रा. उमराळे बुद्रुक नाशिक, सध्या रा. भाग्यलक्ष्मी रो हाऊस नंबर 3 मेहरधाम पंचवटी ) अविनाश शिवाजी गायकवाड ( 32, शुभम पार्क बिल्डिंग नंबर 7, फ्लॅट नंबर 32, अंबड ), केतन गणेश भावसार (१९, रा. राजरत्न नगर) यांच्यायह एका अल्पवयीन मुलाने कोयत्याच्या साहाय्याने दहशत निर्माण करत चार चाकी वाहनांच्या व नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाच्या बाहेरील पाणीपुरीच्या गाडयाच्या काचा फोडल्या होत्या.

या संशयितांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी यांचे पूर्वीच्या गुन्ह्यां संदर्भात तपासणी केली.या प्रकरणात परस्पर विराेधी गुन्हे दाखल असून दाेन्ही गटातील संशयित सराईत गुन्हेगार आहेत. दरम्यान, सदर चार संशयितांसह राम सुर्यवंशी ( ३३,रा. शुभम पार्क, नवीन नाशिक )याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार केला.त्यावर लवकरच कारवाई हाेऊ शकते.

यानंतर एक ते दाेन वर्षांसाठी संशयितांना शहर व जिल्ह्यातून तडीपार केले जाऊ शकते.पूर्वीच्या गुन्ह्यांबद्दल गुन्हेगार सुधार मेळाव्यात यातील काही संशयितांनी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र दिले हाेते. ते सुद्धा आता रद्द केले जाणार असल्याचे व.पो.नि. भगीरथ देशमुख यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com