नाशकात पुन्हा दोन तडीपार; वर्षभरात 'इतक्या' कारवाया

नाशकात पुन्हा दोन तडीपार; वर्षभरात 'इतक्या' कारवाया

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भद्रकाली हद्दीत दोन जणांना तडीपार (Tadipar) करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले असल्याने वर्षभरात ही सतरावी तडीपारी आहे. विविध गुन्ह्यांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या आणि समाजाला त्रासदायक असलेल्यांची तडीपारी केली जात असते. नावेद ऊर्फ नाना शफीक शेख (Naved Shaikh) (२३, रा. गंजमाळ), रोहित ज्ञानेश्वर सोळशे (Rohit Solashe) (२१, रा. भीमवाडी) अशा दोघांना तडीपार करण्यात आले....

भद्रकाली पोलीस ठाण्याकडून (Bhadrakali Police Station) वर्षभरात सतरा जणांची तडीपारी करण्यात आली आहे. त्यातील दोघांचे सोमवारी (ता. १३) तडीपारीचे आदेश निघाले. वारंवार विविध प्रकारचे गुन्हे करून समाजासाठी त्रासदायक ठरणाऱ्या संशयितांना पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने शहर- जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असते.

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या कक्षात येणाऱ्या विविध भागातील, अशा १७ संशयितांवर भद्रकाली पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्तांनी (Deputy Commissioner of Police) काढलेल्या आदेशानुसार त्यांना तडीपार करण्यात आले आहे.

समाजातील शांतता भंग करत कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांच्याकडून निर्माण केला जातो. असे होऊ नये, तसेच कुटुंबीयांपासून दूर राहून त्यांना सुधारण्याची एक संधी म्हणून त्यांना तडीपार करण्यात येत असते. याच अनुषंगाने वर्षभरात विविध महिन्यांमध्ये असे पंधरा जणांपैकी काहींना एक वर्षासाठी तर काहींना दोन वर्षासाठी अद्यापपर्यंत तडीपार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com