नवीन नाशिक
नाशिक
सातपूर पोलिसांकडून तडीपार जेरबंद
नाशिक । Nashik
शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात वावारणार्या तडीपारास सातपूर पोलीसांनी शनिवारी (दि.20) रात्री जेरबंद केले.
तुकाराम दत्तु चोथवे (29, रा. क्रांतीचौक पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. चौथवे यास 2 नोव्हेंबर 2020 रोजी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे.
असे असतानाही तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आढळून आला. चौथवे हा सातपूर परिसरातील पपया नर्सरी परिसरात असल्याची माहिती मिळताच सातपूर पोलीसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
याप्रकरणी त्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक झोले करत आहेत.