नायलॉन मांजा वापरणारा नाशकातून तडीपार

नायलॉन मांजा वापरणारा नाशकातून तडीपार
चायना मांजा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नायलॉन मांजा (Nylon Manja) बाळगल्याप्रकरणी नाशिकमध्ये तडीपारीची (Tadipar action against nylon maza) कारवाई करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे....

अधिक माहिती अशी की, अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील निशांत किशोर सोनकर ( रा. महाराणा प्रताप चौक, नवीन नाशिक) याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६(१)(अ) प्रमाणे आज तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. या व्यक्तीला ३० जानेवारीपर्यंत नाशिक शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

नायलॉन मांजाला पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत असतानाच आता पोलीस आयुक्तांनीदेखील कडक कारवाईसाठी आदेश दिले आहेत.

उपआयुक्त आपापल्या परिक्षेत्रात कडक कारवाई करत आहेत. शहरात अनधिकृतपणे काचेची कोटिंग असलेला नायलॉन मांजा विक्री होत आहे. मांज्यामुळे अनेकांचे गळे चिरले गेले आहेत तर अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्यामुळे ४ जानेवारी २०२२ च्या अधिसूचनेनुसार नाशिकसह परिसरात नायलॉन मांजा विक्री, निर्मिती, साठा व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार परिमंडळ २ चे उपआयुक्त विजय खरात (Vijay Kharat DCP Nashik यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाई झाली.

दरम्यान, कोणीही बंदी असलेला नायलॉन मांजा वापरू नये. साठा करू नये आणि विक्रीदेखील करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दुसरीकडे नाशिकमधील नागरिकांना जर कुणी नायलॉन मांजा विक्री करत असेल तर याची माहिती पोलिसांना द्यावे असेही सांगण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही उपआयुक्त खरात यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.