गर्भवतीस मारहाण करणारी सफाई कामगार महिला निलंबित

गर्भवतीस मारहाण करणारी सफाई कामगार महिला निलंबित
जिल्हा रुग्णालय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेस महिला सफाई कर्मचाऱ्याने मारहाण (Beaten) केल्याचे सिद्ध झाल्यावर त्रिसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी महिला दोषी आढळली आहे. तिच्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) यांनी निलंबनाची (Suspension) कारवाई केली असून, चतुर्थ श्रेणी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) रहिवासी हिरा कैलास गारे (Hira Gare) यांना मंगळवारी (दि. ९) रात्री प्रसूती कळा आल्याने कुटुंबीयांनी त्यांना पेठ येथील रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, हिरा यांच्या आरोपानुसार पहाटे चारच्या सुमारास कळा असह्य झाल्याने त्या वॉर्डातील बाथरुमच्या दिशेने जात असताना सफाई कर्मचाऱ्याने त्यांना अडविले. कर्मचाऱ्याने शिवीगाळ करीत हिरा यांना भिंतीवर ढकलले, तसेच 'तुझ्यावर केस करून तुरुंगात पाठवेन आणि तेथेच प्रसूती केली जाईल,' असे म्हणत हिरा यांना मारहाण केली.

या घटनेत भिंतीवर ढकलून दिल्याने पीडित महिला खाली पडून तिच्या पोटाला मार लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसूतीच्या वेळी मुख्य डॉक्टरही उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. हलगर्जीपणामुळे बाळाच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यास एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात प्रसूतीच्या वेळी मुख्य डॉक्टरही हजर नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडितेने व नातलगांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी घटनेतील तथ्य शोधण्यासाठी अतिरिक्त शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती.

समितीने शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी आपला चौकशी अहवाल डॉ. थोरात यांच्याकडे सुपूर्द केला. समितीत अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे व अधिपरिचारिका यांचा समावेश होता.

जिल्हा रुग्णालय
अरेरे! मारहाणीनंतर बाळ गमावलेल्या हिराबाईंचा अस्वस्थ करणारा प्रवास

निलंबन रद्द करण्याची मागणी

निलंबित कर्मचारी महिलेवर कुठलीही योग्य चौकशी न करता कारवाई झाली. त्याविरोधात जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोर चतुर्थ श्रेणी कर्मचारी कारवाईचा निषेध म्हणून एकत्र जमले होते. तसेच डॉ. थोरात यांनी करुणा यांची थेट बदली न करता सक्तीच्या रजेवर, अथवा अन्यत्र बदली करणे क्रमप्राप्त होते, असे संघटनेने म्हटले आहे. करुणा यांचा या प्रकरणात काही दोष सिद्ध झाला असला, तरी आता हे निलंबन थेट रद्द करावे, अशी भूमिका घेणार असल्याचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे भगवान शिंदे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com