सिन्नर येथील मे. स्वस्तिक एयर प्लांटमधून ऑक्सिजन निर्मिती सुरू

सिन्नर येथील मे. स्वस्तिक एयर प्लांटमधून ऑक्सिजन निर्मिती  सुरू
File Photo

नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आमदार दिलीप बनकर यांनी सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी मे. स्वस्तिक एयर प्लांट सुरु करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या ठिकाणी आॅक्सिजन निर्मिती सुरु करण्यात आली आहे...

सन २०१९ पासून विजबिल देयक न भरल्याने हा आॅक्सिजन प्लांट बंद अवस्थेत होता. आ.बनकर यांनी मुंबई गाठत हा विषय उपमुख्यमंत्री अजीत पवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मांडला.

दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश करत लागलीच विज जोडणी सुरळीत करण्याचे आदेश दिले. तनपुरे यांच्या हस्ते स्वस्तिक एयरच्या ऑक्सिजन निर्मीती शुभारंभ पार पडला.

मे. स्वस्तिक एयर रोज ६०० ऑक्सिजन टाक्या भरू शकते आणि या मुळे जिल्ह्यातील प्राणवायूचा तुटवडा भरून निघण्यास हातभार लागेल असा विश्वास तनपुरे यांनी व आमदार बनकर यांनी व्यक्त केला.

केवळ वीज पुरवठा खंडीत असल्याने जर प्राण वायूची निर्मिती बंद असेल आणि कोव्हीड रूग्ण जर त्यामुळे दगावत असतील तर तुर्तास वीज वसुली बाबत अन्य बाबींचा अवलंब करता येऊ शकेल.

परंतु लोकांचा जीव वाचला पाहीजे ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले व आज हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वीत झाला ही बाब महत्वाची असल्याचे मत तनपुरे यांनी व्यक्त केले.

हा प्रकल्प सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे विशेष सहकार्य मिळाल्याबद्दल आभार आ.बनकर यांनी व्यक्त केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com