कोयता बाळगणाऱ्यास अटक

कोयता बाळगणाऱ्यास अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दरोडा (robbery) व शस्त्र विरोधी पथकाने (Anti-Arms Squad) भद्रकाली परिसरात अवैधरित्या कोयता बाळगणाऱ्या एकास सापळा रचून अटक केली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांच्या अवैध शस्त्र (illegal weapon) बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानुसार दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते (Assistant Police Inspector Dnyaneshwar Mohite) व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आदित्य संतोष सोळसे (२१,रा.तीवंधा लेन,जटार वाडा,भद्रकाली,नाशिक ) याला

सापळा रचून जुनी तांबट लेन,भद्रकाली येथून ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीररित्या धारदार लोखंडी कोयता आढळून आला. याप्रकरणी संशयित सोळसे याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com