नाशिकची स्वरा करमरकर; टेबल टेनिस स्पर्धेत उपविजेती

नाशिकची स्वरा करमरकर; टेबल टेनिस स्पर्धेत उपविजेती

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नागपूर (Nampur) येथे सुरू असलेल्या दुसर्‍या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत (table tennis tournament) नासिकच्या (nashik) स्वरा करमरकर (Swara Karmarkar) हिने 13 वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद (runner-up) मिळविले.

स्वरा ही बिगर मानांकित खेळाडू असून अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उपउपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या सहाव्या मानांकित अन्वी थोरात (Anvi Thorat) हिचा 3-0 असा सरळ तीन गेम (game) जिंकून पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या (pune) तिसरी मानांकित नैशा रेवास्कर हिचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत 3-2 असा पराभव करून आपली घोडदौड चालू ठेवली.

उपांत्यफेरीत तिची गाठ जळगावच्या सातव्या मानांकित स्वरदा सानेचा 4-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र स्वराला प्रथम मनांकित टीएसटीटीए मुंबईच्या (TSTTA Mumbai) दिव्यांशी भौमिक कडून 4-0 असा पराभवाला सामोरे जावे लागले.

स्वरा हिची आयुष्यातील ही तिसरी राज्य मानांकन स्पर्धा (State Ranking Competition) आहे. ती जय मोडक यांचे मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com