नाशिक शहर युवक अध्यक्षपदी स्वप्नील पाटील

राज्य सरचिटणीसपदी गौरव पानगव्हाणे विजयी
नाशिक शहर युवक अध्यक्षपदी स्वप्नील पाटील

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस (Maharashtra Pradesh Youth Congress) अंतर्गत झालेल्या निवडणुकीत (election) नाशिक शहर युवक अध्यक्षपदी स्वप्नील पाटील (Swapnil Patil as Nashik City Youth President) यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला आहे.

जिल्हा सरचिटणीसपदाची (District General Secretary post) धुरा सांभाळत असलेले गौरव पानगव्हाणे हे राज्य सरचिटणीसपदी २८ हजार मते घेऊन विजयी झाले. युवकच्या जिल्हाध्यक्षपदी मानस पराग विजयी झाले आहे. सोमवारी (दि.७) सायंकाळी निकाल जाहीर होताच कॉंग्रेस कमिटीवर (Congress Committee) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

अखिल भारती कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राहूल गांधी (Rahul Gandhi, former president of the All India Congress Committee) यांच्या संकल्पनेतून युवक कॉंग्रेस अतंर्गत निवडणुक प्रक्रीया (Election Process under Youth Congress) सुरू झाली आहे. निवडणुकीचे हे चौथे वर्ष आहे. युवक कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये आॅनलाईन मतदार (voter), निवडणुक प्रक्रीया (electoral process) सुरू झाली होती. तीन महिने सुरू असलेल्या या प्रक्रीयेचा सोमवारी (दि.७) निकाल घोषीत झाला.

यात युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल नितीन राऊत विजयी झाले आहेत.प्रदेश सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत नाशिकमधून गौरव पानगव्हाणे विजय प्राप्त केला आहे. त्यांना २८ हजार मते मिळाली. शहर अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत स्वप्नील पाटील सलग चौथ्यांदा विजयी झाले. पाटील यांच्या विरोधात सर्व गटांनी मिळवून उमेदवार दिला होता.

मात्र, पाटील यांनी नितीन काकड यांचा पराभव करत विजय मिळविला. युवकच्या जिल्हाध्यक्षपदासाठी ओझर येथील मानस पराग यांनी १४ हजार मते घेत विजय मिळविला. त्यांनी माजी जिल्हाध्यक्ष दिनेश चौथवे यांचा पराभव केला. तसेच मध्य-नाशिकच्या अध्यक्षपदी जयेश सोनवणे ,पश्चिम नाशिकच्या अध्यक्ष पदी देवेंद्र देशपांडे, पूर्व नाशिकच्या अध्यक्षपदी रोहन कातकडे, प्रदेश सचिवपदी आतिषा पैठणकर यांची मतदानातून निवड झाली आहे.

निवड घोषीत झाल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये नवनिर्वाचितांचे शहराध्यक्ष अध्यक्ष शरद आहेर,गटनेते शाहू खैरे,जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे,प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, नगरसेवक समीर कांबळे, नगरसेवक वत्सला खैरे,नगरसेवक राहुल दिवे, सुरेश मारू, उध्दव पवार,किरण जाधव, विक्रांत वावरे, गौरव सोनार ,प्रमोद धोंडगे,, सुदेश मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com