जि. प. नाशिक
जि. प. नाशिक
नाशिक

स्वच्छ भारत अभियान ग्रामसेवकांना ऑनलाइन प्रशिक्षण

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ची घोषणा करण्यात आली आहे. या अभियानाच्या मार्गदर्शक सुचनाही केंद्र शासनाने निर्गमित केल्या आहेत. दुस-या टप्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यावर शासनाचा अधिक भर असून यासाठी सर्व देशामध्ये पायाभूत सर्वेक्षणासही सुरवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्हयात देखील ३१ ऑगस्टपर्यत हे सर्वेक्षण पुर्ण करण्यात येणार असून यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांना टप्प्याटप्याने ऑनलाइनव्दारे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत देशात वैयक्तिक शौचालयांची काम करण्यात आली आहेत. यासाठी २०१४ च्या सर्वेक्षणातून सुटलेल्या सर्व लाभार्थ्यांचीही शौचालये बांधून पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम २०१९ पर्यत असल्याने यापूढे काय असा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ची घोषणा करुन २०२४-२५ पर्यंत प्रत्येक गावामध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन करणे, प्लॅस्टिकचे व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता व वापर यावर भर दिला आहे.

यासाठी मोबाईल ॲपव्दारे सर्व गावांचे पायाभूत सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती व गावांमध्ये सदरचे सर्वेक्षण पुर्ण करावयाचे असल्याने याबाबत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उप अभियंता, ग्रामसेवक आदि तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय यंत्रणेला आजपासून ऑनलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी प्रत्येक ग्रामसेवकाने प्रशिक्षण पुर्ण करून विहित वेळेत पायाभूत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. सदरच्या सर्वेक्षणावरच ग्रामपंचायतींना सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना करणे शक्य होणार असल्याने ग्रामसेवकांना अचूकपणे सर्वेक्षण करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com