द्राक्ष उत्पादकांसाठी स्वाभिमानीचा पुढाकार

द्राक्ष उत्पादकांसाठी  स्वाभिमानीचा पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यामध्ये विशेषत: दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka )अनेक द्राक्ष उत्पादक ( Grapes Growers ) शेतकर्‍यांचे पैसे व्यापार्‍यांनी आजपर्यंत दिलेले नाही. मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादकांची फसवणूक झालेली आहे. या द्राक्ष उत्पादकांचे पैसे मिळावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Swabhimani Shetkari Sanghatna )प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिंडोरी तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेतली.

तहसीलदारांच्या दालनामध्ये एपीआय कल्पेश कुमार चव्हाण, द्राक्ष उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन कड यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. तहसीलदार पंकज पवार यांनी लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील. व्यापार्‍यांवर कठोर गुन्हे दाखल करू व प्रशासनाला शेतकर्‍यांशी सहानुभूतीने वागण्याचे आदेश देऊ. असे सर्व शेतकर्‍यांना आश्वासित केले.

यावेळी एकनाथ पाटील, सतीश पाटील,चेतन पाटील,भास्कर पताडे, पोपट पाटील,भाऊसाहेब ढगे,प्रवीण बोरस्ते आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. शेतकर्‍यांचे पैसे बुडवले तरी आपले काहीच होत नाही असा गैरसमज व्यापार्‍यांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा धाक निर्माण केला पाहिजे. तसेच शेतकर्‍यांनीही संघटित होऊन आपल्यावर जो अन्याय होतो. त्यासंबंधी आवाज उठवला पाहिजे असं झालं नाही तर वर्षानुवर्ष आपल्या घामाचे पैसे दरोडेखोर लुटत राहतील.

- संदीप जगताप (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com