नाशिक । प्रतिनिधी

दिल्लीत गेल्या सात दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत.नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहे.त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

या शेतकऱ्यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि.३) राज्यभर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर लोकशाही, व शांततेच्या मार्गाने बसून आत्मक्लेश करणार आहे,अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील सायंकाळी 7 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी रात्रभर जागर करणार आहे. सगळे कार्यकर्ते भाकरी चटणी सोबत घेऊन येऊन तिथेच जेवण करतील व संपूर्ण रात्र तिथेच घालवणार आहे.

या आंदोलनात कलावंत देखील येऊन पाठिंबा देणार आहेत.यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष साहेबराव काका मोरे, राजू शिरसाठ, सुधाकर मोगल, परशराम शिंदे, सुभाष आहिरे यांनी केले आहे.