युवा महोत्सवात एसव्हीकेटीची बाजी

युवा महोत्सवात एसव्हीकेटीची बाजी

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालाय Government of Maharashtra Sports and Youth Services महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागच्या वतीने आयोजित आभासी ऑनलाइन राज्यस्तरीय युवा महोत्सवात Online State Level Youth Festival देवळाली कॅम्प येथील एसव्हीकेटी महाविद्यालयाने SVKT College बाजी मारली.

महाराष्ट्रातील आठ विभागातील संघ सहभागी झाले होते. यात नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील एस.व्ही.के.टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तासरच विभाग स्तरीय फेरीतून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

यात मुख्य कलाकार गौरव बेरड तर सहकलाकार रुषिकेश गायकवाड, वैभव हगवणे, प्रसाद शेळके, प्रसाद शिंदे ,भाग्येश सोननीस ,पुजा गोडसे, वैष्णवी आडके निकिता तुपे आदींनी खंडोबाचा जागरण गोंधळ सादर करत यात खंडोबाचे महात्म्य वर्णन केले तसेच जागरण गोंधळ कधी व का घालतात ह्याची देखील माहिती सादरीकरणातून दिली.

यासाठी प्राचार्य डॉ विजय मेधने , प्रा.डा.जयश्री जाधव,प्रा.अमृतकर सर, गुरुवर्य गोकुळ निसाळ सर, विक्रम कवटे ,रोशन भिसे आदिंचे मार्गदर्शक लाभले.या बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी महेश पाटील, शिवयुवा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.