नवमतदार जनजागृतीसाठी 'स्वीप' कार्यक्रम

नवमतदार जनजागृतीसाठी 'स्वीप' कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारत निवडणूक आयोगामार्फत Election Commission of India नवमतदारांपर्यंत New Voters निवडणुकीसंदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी राज्यात ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग’ (स्वीप) Sveep हा जागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्व आहे. शासकीय- निमशासकीय विभाग, अशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, युवा-स्त्रिया, दिव्यांग, तृतीय पंथी, ग्रामीण-शहरी नागरिक, आदिवासी, स्थलांतरीत अशा विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे.

सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय विभागाने एका अधिकार्याची ‘स्वीप’ कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून निवड केली जाणार आहे. ग्रामविकास विभागाने संविधान दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यात मतदारयाद्या वाचाव्यात, त्यात मतदारांचे नाव नसेल त्यांना माहिती देता येईल.

प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील अधिकारी-सेवकांच्या सक्रिय सहभागाने जागृतीपर कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com