
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना रात्रीच्या पोलीस (Police) गस्तीदरम्यान रामसेतू पुलाखाली गंगाघाट येथे पंचवटी पोलिसांनी शिताफीने अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंचवटी पोलिसांचे (Panchavati Police) पथक नित्याप्रमाणेच (दि.२१) रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास गंगाघाट येथे गस्त करत असतांना त्यांना रोहीत उर्फ लाल्या दिपक भालेराव (२३, रा. इंगळे कॉलनी, लामखेडे मळा, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक), गौरव कैलास गदावी (२२,रा. फ्लॅट नं ९. तुलसी विहार अपा, तारवाला नगर, दिंडोरीरोड, पंचवटी, नाशिक), राहुल विनोद वाघेला ( २१, रा. फ्लॅट नं. ५अत्रीसुत कृपा अपा. पाण्याचे टाकीमागे, शिवाजी नगर, जेलरोड, नाशिक), उदय सुनिल चारोस्कर, (२१,रा. लक्ष्मणनगर, फुले नगर, पंचवटी, नाशिक), विकी उर्फ काळया कोयत्या बाळु जाधव, रा. नवनाथ नगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक) हे रामसेतूपुलाच्या खाली संशयितरित्या फिरतांना आढळून आले.
पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस पथकाने त्यांना शिताफीने पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोडा (robbery) टाकण्यासाठी असलेले धारधार हत्यारे मिळून आले.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करत आहेत.