
नवीन नाशिंक | प्रतिनिधी | Navin Nashik
नवीन नाशिक (navin nashik) परिसरात गुन्हेगारीच्या (criminality) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून
यापूर्वी घडलेल्या बऱ्याच गुन्ह्यांमधील संशयित अद्यापही पोलिसांना सापडलेच नसल्याने पोलिसांच्या (police) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांना दहशतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत त्रिमूर्ती चौक, अंबड लिंक रोड वर गेल्या वर्षभरापूर्वी रिपाईचे (RPI) पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने गोळीबार (firing) केला होता. या घटनेतील संशयितांचा शोध घेण्यास अंबड पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याने नवीन नाशकात नागरिक किती सुरक्षित आहेत याची प्रचिती नागरिकांना आली आहे.
यासोबतच गेल्या सात वर्षांपुर्वी उत्तम नगर येथील किराणा व्यवसायिक अनिल शिरुडे यांच्यावर त्यांच्या घरात पहाटेच्या वेळी प्रवेश करून एका व्यतीने धारधार शस्त्राने त्यांच्या पोटात वार केले होते. या घटनेने संपूर्ण व्यवसायिकांमध्ये भीती पसरली होती. या घटनेबाबत अनेक वेळा आंदोलने (agitation) झाली. मात्र ७ वर्ष उलटूनही अंबड पोलिसांना संशयित सापडले नाही. गेल्या काही दिवसांपासून नवीन नाशकात (navin nashik) टोळक्यांनी दहशत माजविल्याचे प्रकार समोर आले आहेत मात्र अद्याप गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे.
चुंचाळे शिवारात असलेल्या अवैध व्यवसाय व गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ रोखण्याकरिता स्थानिक नागरिक लोकशाहीच्या मार्गाने अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा करणार होते मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी तर नाकारलीच व नागरिकांना नोटस दिल्याने लोकशाही अस्तित्वात आहे कि नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
माझ्यावर झालेल्या गोळीबारामुळे केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग रामदास आठवले यांनी माझी भेट घेऊन पोलिसांना संशयितांना शोधण्याचे आदेशित केले होते. यासोबतच तत्कालीन आयुक्त दीपक पांडे यांनी स्वतः चौकशी केली होती. याबाबत तपास करावा म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला आहे. परंतु अंबड पोलीस तपास करीत नसल्याचे दिसते आहे.
- प्रशांत जाधव, आरपीआय नेते.