तीन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितांना अटक

तीन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितांना अटक

नवीन नाशिक । प्रतिनिधी

मारहाणीच्या प्रकरणात तीन महिन्यांपासून फरार असलेल्या चार जणांपैकी तीन जणांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश अंबिका विश्वकर्मा ( 50 रा. फ्लॅट नंबर 7, इच्छामणी प्राईड, खान बंगला जवळ केवल पार्क रोड कामटवाडे ) हे त्यांच्या इंडिको कार ( एम एच 15 जी ए 4090 ) ने अंबड औद्योगिक वसाहतीतील आर पी स्वीट जवळून जात असताना संशयित सीमा भागवत आहिरे व शीतल कटारे यांनी माझ्या गाडीत कट का मारला ? असे सांगत शिवीगाळ करत यातील सीमा हिने दिनेश यांच्या डोक्यात व हातावर रोड मारला तर शीतलने दगडाने त्यांच्या गाडीची काच फोडली तसेच भागवत आहिरे व राहुल पानपाटील यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत दिनेश हे गंभीर जखमी झाले होते ही घटना 14 फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या वेळेपासून संशयित हे फरार होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते मात्र ते मिळून येत नव्हते अशातच पोलिसांना ते नवीन नाशकात एका ठिकाणी येत असल्याचे खबऱ्या मार्फत समजले. यावरून पोलिसांनी सापळा रचत सीमा भागवत अहिरे, शितल कटारे, राहुल पानपाटील यांना शिताफीने अटक केली तर भागवत आहिरे हा अद्याप पर्यंत फरार आहे

संशयितांना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम शेळके, पोलीस शिपाई महेंद्र आंबेकर करीत आहेत दरम्यान या प्रकरणातील सीमा आहिरे ही फिर्यादी दिनेश यांची व्यवसायातील भागीदार होती. याप्रकरणी तो दृष्टिकोन समोर ठेवून देखील पोलिसांकडून तपास सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com