
ओझे | वार्ताहर | Oze
वणी पोलिस स्टेशनच्या (Vani Police Station) हद्दीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी दुकाने (Shops) फोडून सुमारे 1 लाख 38 हजार 320 रुपयांचा ऐैवज चोरुन नेल्या प्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची (Theft) कबूली देत १ लाख ३० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री वणी पोलीस ठाणे हद्दीतील लखमापुर फाटा (Lakhmapur Phata) येथील राघव मोबाईल शॉपी दुकानात रात्री दुकानाचे पाठीमागील सिमेंट कॉक्रीटचा पत्रा तोडून काही अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील मोबाईल, ब्लुटुथ स्पिकर, पॉवर बँक, साऊड बार असा एकूण १ लाख ३ हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
तसेच (दि.३०) नोव्हेंबर रोजी रात्री खेडगाव गावातील भुषण किराणा दुकानाचे पाठीमागील पत्र्याचे नट खोलून काही अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन दुकानातील मुरली तेलाचे डबे व सुट्टे पैसे असा एकूण १२ हजार ६७० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेले होते.
त्यानंतर (दि,०१) डिसेंबर रोजी रात्री अंबानेर फाटा (Ambaner Phata) येथील सप्तश्रृंगी किराणा दुकानाचे पाठीमागील बाजुचा पत्रा कापुन काही अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन दुकानातील वापराता लॅपटॉप, गोडेतेलाचे डबे व बॉटल व पाऊच व मोबाईलचे ३० चार्जर असा एकुण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
याप्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये तीनही घरफोडी (Burglary) करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तसेच सदर गुन्हयांचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ कवीता फटतरे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्निल राजपुत, पोउनि पी. टी. जाधव, यांच्यासह आदी पोलिस हवालदारांनी गुन्हा घडल्याचे ठिकाणाचे आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन सखोल चौकशी केली.
दरम्यान, त्यानंतर सदर गुन्हयात संशयावरुन १) किरण नामदेव पागे (२८) रा. इंदोरे ता. दिंडोरी २) दिंगबर गंगाधर गांगोडे (२१) रा. मडकीजांब ता. दिंडोरी ३) विकास शंकर चारोस्कर (३०) रा. गवळवाडी ता. दिंडोरी ४) तुकाराम बाबुराव चोरटे (३०) रा. माळेदुमाला ता. दिंडोरी ५) संदिप सदाशिव गवळी (२६) रा. सोनजांब ता. दिंडोरी यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनीच सदरचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावेळी त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, ब्लुटुथ स्पिकर, पॉवर बँक, साऊड बार, मोबाईलचे चार्जर तेलाचे डबे व सुट्टे पैसे असा एकुण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून सदर आरोपींची अधिक चौकशी सुरु आहे.