नोंदणीकृत कुक्कुट पालन संस्थेंचे सर्वेक्षण

नोंदणीकृत कुक्कुट पालन संस्थेंचे सर्वेक्षण

पेठ । प्रतिनिधी Peth

मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांत बर्ड फ्ल्यू विषाणू सारख्या आजाराची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीवरुनही निश्चित झाली आहे.

त्या अनुषंगाने पेठ तालुक्यात पक्ष्यांमधील बर्ड फ्ल्यू सारख्या आजाराचा प्रादुर्भाव वेळीच रोखणेकामी नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या आदेशान्वये पेठ तालुक्यात आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे कार्यक्षेत्रात नोंदणीकृत कुक्कटपालन व्यवसायांची व तेथील काम करणार्‍या कामगारांची आरोग्य विभाग व पशुवैद्यकिय विभागाकडून माहीती घेण्यात येत आहे.

एकूण नोंदणीकृत कुक्कटपालनाची संख्या, तेथे काम करणाऱ्या एकुण कर्मचार्‍यांची संख्या, सर्वेक्षणा दरम्यान फ्लयू - सदृश्य रुग्णांची संख्या आणि फ्ल्यू सदृश्य आजारासारख्या आढळलेल्या व्यक्तींना संदर्भित, रुग्णांची संख्या आदी माहीती संकलित करुन जिल्ह्याला कळविली जाणार आहे.

त्यामुळे या आजारावर वेळीच खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहीती आरोग्य सेवक के.पी.ठाकरे यांनी आरोग्य उपकेंद्र कार्यक्षेत्रात डोमखडक गावी पोल्ट्री व्यवसायकांची माहीती घेण्याकामी आले असतांना प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

यावेळी जोगमोडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, आरोग्य सहाय्यक राजेंद्र तवर, आरोग्य सेवक किसन ठाकरे, आशा स्वयंसेविका रेखा जाधव व पोल्ट्री व्यवसायिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com