सुरगाणा वार्तापत्र: आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबणार केव्हा ?

सुरगाणा वार्तापत्र: आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबणार केव्हा ?

सुरगाणा | वाजिद शेख | Surgana

सुरगाणा (surgana), पेठ (peth), त्र्यंबकेश्वर (tryambakeshwar), इगतपूरी (igatpuri) या तालुक्यातील शेती (farming) हि पावसावर पाण्याच्या आहे जोपर्यंत पाणी पडते तोपर्यंत लोक शेती करतात. येथे लोकांना प्रशासनाने, सरकारी सेवकांनी मार्गदर्शन करून त्यांना जर प्रत्येकाच्या शेतीमध्ये शेततळे बांधायला पाठपुरावा केला.

त्यांना मार्गदर्शन केले त्यासाठी प्रक्रिया काय? किती अनुदान (Grants) मिळते त्याचा शेतीसाठी फायदा काय? आपले उत्पन्न वाढू शकते का घडू शकते. याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली याबाबत सखोल मार्गदर्शन केले. लोक शेततळे बांधून आपले उत्पन्न वाढवू शकतात. पर्यायाने आपले कुटुंब सधन बनवू शकतात. यामुळे स्थलांतर करण्यास नक्कीच आळा बसेल. आदिवासी समाजासाठी (tribal community) वेगवेगळ्या योजना येत असतात. त्या लोकांपर्यंत पोहोचताच नाहीत दरवर्षी कोट्यवधी निधी (fund) शासनास परत पाठविला जात आहे. त्याच निधीचा वापर आदिवासी बांधवांसाठी केला.

सुरगाणा (surgana) सारख्या भागातील एकंदरीत महाराष्ट्रातील (maharashtra), एकंदरीत भारतातील आदिवासी समाजही इतरांबरोबर वरती येईल असे नाही का वाटत आपल्याला? आदिवासी समाजाला वेगवेगळ्या योजनांची माहिती वेळेवर मिळत नाही. मिळालीच तर ती अर्धवट मिळते मग ती पूर्ण करण्यात ती योजनाच संपुष्ठात येते कि आजची परिस्थिती आहे. मग माणूस पैसे कसा कमावेल आपले कुटुंब कसे चालवेल तुम्हीच सांगा ! समाजाला वेगवेगळ्या योजनांचे सखोल मार्गदर्शन (Guidance), शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान (Advanced technology) कोणते ते कसे वापरावयाचे, विविध कल्याणकारी योजना कोणकोणत्या, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ सारख्या योजना, कसेल त्याचे शेत, वनजमिनीवरील हक्क, थोड्याच शेतीतून दुप्पट पीक कसे मिळवायचे आणि त्याच दुप्पट पिकातून आपले जीवन,

आपला समाज कसा पुढे घ्यायचा? याबाबत जोपर्यंत लोकांना स्थानिक पातळीवर, गावपातळीवर, शासनपातळीवरील सखोल मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत पैसे मिळविण्यासाठी, कुटुंबाची गुजराण करण्यासाठी स्थलांतर हे होतंच राहील. स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी (Employment opportunities) उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्राचे (maharashtra) पाणी गुजरातमध्ये (gujrat) जात असून त्याचा फायदा गुजरातमधील लोकांना होत आहे आणि मग त्याचा परिणाम जवळील लोकांच्या राहणीमानावर होत असून लोक स्थलांतर करण्यास भाग पाडतात.

याचा विचार केला तर महाराष्ट्रातील जे काही पाणी सुरगाण्याच्या (surgana) दिशेने गुजरातकडे जात आहे. त्याच पाण्याचा विचार केला तर ते पाणी (water) ते पाणी अडून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हरित क्रांती करता येईल व जे लोक स्थलांतर करत आहे. त्यांना निर्बंध लागतील म्हणजेच जागोजागी छोटे छोटे पाटबंधारे बांधले तर लोकांना त्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल व लोक स्वत: ची शेती करून उत्पन्न काढू लागतील व स्थलांतरास आळा बसेल.

त्याचप्रमाणे सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) माध्यम हातावर पोट भरणारी माणसं पावसाळी हंगाम संपला की घाटमाथ्यावर आपली उपजीविका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर तालुक्यामध्ये कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात वानवा निर्माण होते. याचा विचार केला तर तालुक्यामध्ये शेतीकडे लोक मोठ्या आशेने बघतात असे दिसत नाही. परंतु शेती क्षेत्राचे संबधित प्रक्रिया करणारे कारखाने (Factories), उद्योगधंदे (Businesses) स्थानिक लोकांना उपलब्ध करून दिले तर लोक त्यांचे अनुकरण करून स्थलांतर होण्यापासून आळा बसेल.

द्राक्ष (Grapes) खुडणी असेल डाळिंब (Pomegranate) काढणे असेल बागायती कामे करण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) माणसे मोठ्या प्रमाणात घाटमाथ्यावर, गुजरातमध्ये स्थलांतरित होत असतात त्याला आळा घालण्यासाठी कोणीही काही उपाययोजना करताना दिसत नाही. ज्याचे ज्याला त्यालाच पडले आहे. त्यामुळे सुरगाणा तालुक्यामध्ये सामान्य कामगार राबवला जातो की दाबला जातोय हे सांगणे कठीण आहे. मग तालुक्यातील चित्र विचित्र दिसत असते जो मध्यमवर्ग आहे तो परत खाली जातोय आणि जो श्रीमंत आहेत तो वरती जातोय असे चित्र तालुक्यामध्ये दिसत आहे.

सुरगाणा तालुक्यामध्ये एमआयडीसी (MIDC) सारखा औद्योगिक प्रकल्प (Industrial project) उभारले गेले तर भविष्याच्या दृष्टीने खूप चांगले वातावरण निर्माण होईल. तालुका समृद्ध होण्यासाठी तालुक्यामध्ये एमआयडीसी असणे काळाची गरज आहे कारण जे लोक स्थलांतर करून उपजीविका करतात त्यांच्या हाताला दोन पैशाची काम लागतील त्याचे कुटूंब जगेल. परिणामी त्या ठिकाणी औद्योगिक वसाहती (Industrial colony) निर्माण होऊन लोकांचा राहण्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न तूर्तास सुटेल. यात मात्र तिळमात्र शंका नाही आणि याचाच भाग म्हणून स्थलांतरितांचा मोठा प्रश्न सुटेल हे तेवढेच सत्य आहे.

तालुक्यांमध्ये कधीकधी सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो प्रशासन पातळीवर, गावपातळीवर त्याच पडणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केले तर वर्षभर शेतजमीन ओलिताखाली होऊन शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न मिळवून देणारे पिके घेता येतील लोक वर्षभर शेतीमध्ये आपले काम करीत राहतील परिणामी स्थलांतर होण्यास मोठ्या प्रमाणात आळा बसेल. तालुक्यातील लोकांसाठी सुधारित औद्योगिक, नवनवीन, शेतीविषयक कार्यशाळांचे आयोजन करून सर्व प्रकारची माहिती वेळोवेळी देणे काळाची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षित अधिकारी वर्ग नेमून शेतीविषयक प्रशिक्षणाची तालुकास्तरावर, विभागस्तरावर, गावपातळीवर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

जेणेकरून शेतीविषयक अद्ययावत माहिती मिळून शेतकरी आधुनिक शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून आपला तालुका सुजलाम् सुफलाम् करतील यात तिळमात्र शंका नाही. तालुक्यातील आदिवासी मुले मुली खेळामध्ये मोठ्या प्रमाणात आपले नाव लौकिक मिळवताना दिसत आहे. परंतु प्रशिक्षित प्रशिक्षकांची उणीव पुरेशा सोयी सुविधांच्या अभावी मोठ्या प्रमाणात आपल्या कौशल्यांचा देखावे शहरात जाऊन करावे लागते, ही बाब तालुक्याच्या दृष्टीने खेदजनक आहे. परिणामी सुशिक्षितांचे स्थलांतर परिणामी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे याला आळा घालण्यासाठी तालुक्यांमध्ये स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी खेळाशी संबंधित परिपूर्ण कौशल देणारे प्रशिक्षण आणि ते खेळ शिकवणारे प्रशिक्षक मुलांना उपलब्ध करून देणे काळाची खूप मोठी गरज आहे. जेणेकरून तालुक्यातील जे कौशल्य आहे ते इतरत्र जाता कामा नये, याचाच भाग म्हणून सुशिक्षितांचे होणारे स्थलांतर यास आळा बसेल.

Related Stories

No stories found.