सुरगाणा वार्तापत्र: ‘मिशन नवोदय’मुळे उंबरठाण शाळेची प्रतिमा उंचावली

सुरगाणा वार्तापत्र: ‘मिशन नवोदय’मुळे उंबरठाण शाळेची प्रतिमा उंचावली

सुरगाणा | वाजीद शेख | Surgana

आदिवासी भागातील (tribal area) विद्यार्थ्यांना (students) बालवयात स्पर्धा परिक्षेची (Competitive Examinations) माहिती व्हावी,

हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळावा व त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण (Quality education) मिळावे या उद्देशाने उंबरठाणच्या (umbarthan) जिल्हा परिषद शाळेत (zilha parishad school) सतीश इंगळे यांनी वर्गात ‘ मिशन नवोदय’ (Mission Navodaya) हा उपक्रम चालू केला.

शैक्षणिक वर्ष 2019-20 जून महिन्यातच परिक्षेची तयारी चालू केली. विद्यार्थ्यांची (students) तयारी करून घेत असतांना विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत गेला. वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार झाले. सराव प्रश्नसंच सोडवत असतांना इंगळे सरांचे विद्यार्थी एकमेकांशी स्पर्धा करू लागले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून सरांचादेखील उत्साह वाढू लागला. भरपूर सराव प्रश्नसंच सोडवून विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सरांच्या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. त्यापैकी प्रणाली पवार या विद्यार्थीनीने नाशिक जिल्ह्यात (nashik district) प्रथम क्रमांक पटकावला. सरांच्या मेहनतीला खुप मोठे यश मिळाले.

मागील वर्षीचा निकाल चांगला लागल्यामुळे वरिष्ठांनी इंगळे सरांना पुन्हा एकदा शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये मिशन नवोदय उपक्रम राबविण्याची संधी दिली. पण कोविडसारख्या महामारीमुळे सर्वच शाळा बंद होत्या. शहरी भागात ऑनलाइन शिक्षण चालू होते. पण उंबरठाण शाळेच्या गावात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण (online education) देणे शक्य नव्हते म्हणून इंगळे सरांनी ’ओट्यावरची शाळा’ हा उपक्रम चालू करून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले व ओट्यावरच्या शाळेतून मिशन नवोदय उपक्रम चालू ठेवला. त्या बरोबरच मिशन स्कॉलर (Mission Scholar) व मिशन एकलव्य रेसिडेंसी स्कूल (Mission Eklavya Residency School) हे उपक्रम चालू केले.

ओट्यावरची शाळा

वर्गातील विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील ओट्यावर, सभागृहात, मंदिरात, उंबरठाणमध्ये वेगवेगळ्या पाड्यावरून विद्यार्थी (students) येतात म्हणून पाड्यावरच विविध ठिकाणी बसवले. शाळेतील नवे, जुने फलक प्रत्येक ओट्यावर ठेवले. विद्यार्थ्यांना अभ्यास दिल्यावर जिथे अडचण येईल तो भाग समजावून सांगण्यासाठी फलकाचा उपयोग होत असे.

‘डोनेट अ बुक’

इंगळे सरांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय व शिष्यवृत्ती परिक्षेची (Scholarship Exam) तयारी करता यावी म्हणून शाळेत ’डोनेट अ बुक’ (Donate a book) उपक्रम राबवला. सहकारी शिक्षक, ग्रामस्थ यांच्याकडून 23 विद्यार्थ्यांना नवोदय संच व 6 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संच मिळवले व गरीब विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी करण्यासाठी हे संच दिले.

मिशन स्कॉलर

नवोदय परिक्षेची तयारी करत असतांना विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने वर्गात मिशन स्कॉलर हा उपक्रम चालू केला. वर्गात शिष्यवृत्ती परिक्षेची देखील तयारी चालू केली. यामध्ये देखील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला.

मिशन एकलव्य रेसिडेंसी स्कूल

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंसी स्कूल असते. आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळावा व पुढील शिक्षण उत्तम दर्जाचे मिळावे म्हणून मिशन एकलव्य रेसिडेंसी स्कूल हा उपक्रम शाळेत चालू केला. शैक्षणिक वर्ष 2020-21 ची तयारी ओट्यावरच्या शाळेतून करून घेतल्यानंतर त्याची फलनिष्पत्ती म्हणजे पाच विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले व बारा विद्यार्थ्यांना एकलव्य माडेल रेसिडेंसी स्कूलला प्रवेश मिळाला.

शैक्षणिक वर्ष 2021-22 पुन्हा तिसर्‍यांदा सतीश इंगळे यांनी ’मिशन नवोदय’ उपक्रम राबवला व तो यशस्वी ठरला. या वर्षात देखील निर्झरा गायकवाड, वृषाली गावित व दर्शन भोये या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय खेडगावसाठी निवड झाली. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी धंनजय कोळी, बीट विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे, केंद्रप्रमुख अशोक वाघ, मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, ओट्यावरच्या शाळेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनिषा देशमुख व गावातील ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.

तसेच ’मिशन नवोदय’ यशस्वी करण्यासाठी सतीश इंगळे सरांबरोबर मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, शिक्षक जयराम धुम, राजेश भोये, राजेंद्र गावित, शिक्षिका सुमित्रा जाधव, संगिता भोयेव योगिता महाले हे सर्वजण प्रयत्नशील आहेत. सलग तीन वर्ष ’मिशन नवोदय’ उपक्रमाला उत्कृष्ट यश मिळाल्यामुळे शाळेतून आजपर्यंत 11 विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय खेडगाव येथे प्रवेश मिळाला आहे. म्हणून उंबरठाण जिल्हा परिषद शाळेला जिल्हा भरात ’मिशन नवोदय यशस्वी करणारी शाळा’ म्हणून ओळखले जाते. शाळेला ही नवी ओळख मिळाल्यामुळे आसपासच्या गावातील विद्यार्थी देखील उंबरठाण शाळेत येऊ लागले आहेत. पटसंख्या वाढीसाठी ग्रामस्थांचे देखील शाळेला सहकार्य मिळू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com