सुरगाणा : बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

सुरगाणा : बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

हतगड । लक्ष्मण पवार Hatgad / Surgana / Aamjhar

सुरगाणा तालुक्यातील ( surgana ) अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण गंगाजी वाघमारे यांच्या मालकीच्या तेरा शेळ्यांवर बिबट्याने ( Leopard ) हल्ला करुन ठार केल्या .

आमझर गावात आदिवासी पारंपरिक पद्धतीने रानभाजी तेरा खाण्याचा सण होता. त्यामुळे पशुपालकाने जंगलात चारण्याकरीता घेतलेल्या पंधरा ते वीस शेळ्यां जंगलात सोडून तो सण असल्याने निघून आला.

नेहमी प्रमाणे अंधार पडला की शेळ्यां जंगलातून घराकडे परतायच्या मात्र शेतातील झापावर बक-या परतल्याच नाहीत. तेरा बक-या जंगलातील भोवर हेदीचा दरा येथेच राहिल्या याच द-यात खडकाची कपार असल्याने बिबट्याचा अधिवास असतो. रात्रीच्या सुमारास शेळ्यांच्या कळपावर अचानकपणे हल्ला यापैकी अकरा शेळ्यांवर ह्या एका जागेवर मृतावस्थेत आढळून आल्या तर दोन बक-यांचा अजूनही तपास लागलेला नाही. शेतक-याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.

हा भाग गुजरात राज्याचा सिमावर्ती भागा लगतचा राखीव जंगलाचा आहे. त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात.काही दिवसापुर्वी याच शेतक-याचा गायीचा फडशा पाडला होता. सदर घटनेचा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र ढुमसे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे.

तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ललिता नाळे यांनी शवविच्छेदन केले असून अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com