सुरगाणा तालुका वार्तापत्र: आरोग्यदायी स्ट्रॉबेरी बहरला

सुरगाणा तालुका वार्तापत्र: आरोग्यदायी स्ट्रॉबेरी बहरला

सुरगाणा । वाजिद शेख | Surgana

लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी (Strawberry) म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम (Strawberry season) वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी (Healthy strawberries) सप्तश्रृंगीगड (Saptashringigad), वणी (vani)-सापूतारा (saputara) रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सुरगाणा (surgana), कळवण (kalwan) तालुक्यातील घाटमाथ्यावर लालमातीत पिकणारी लालभडक, लहान मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे वणी, सप्तश्रृंगी गड व सापुतारा रस्यावर मोठ्या प्रमात विक्रीसाठी दाखल झाली असून रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍या भाविक व पर्यटकांना (Tourists) मोहीत करीत आहे. सुरगाणा तालुक्यातील प्रामुख्याने घाटमाथ्यावरील नागशेवडी, घोडांबे, पोहाळी, सराड, चिखली, शिंदे, हतगड, बोरगांव, घागबारी, लिंगामा आदी भागात तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे,

सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा आदी गावांतील आदिवासी शेतकरी (Tribal farmers) शेतकरी भात, नागली, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग (Strawberry orchard in a scientific way) लावत आहे.

या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण, जमिनीची पोत यामुळे याभागात सात आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्याने या भागात दिवसेंदिवस स्ट्रॉबेरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढतच आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठया प्रमाणावर होऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठया प्रमाणावर होऊ लागले आहे.

विंटर, एसए कॅमेर ओझा, नादीला, आर 2, आर 1, तसेच स्वीट चार्ली आदी प्रकारच्या स्ट्रॉबेरीचे वाण असले तरी या भागात सेल्वा, राणी, इंटर, नाभीया यांसह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणार्‍या स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्वर येथून 15 ते 25 रुपयास एक रोप या दराने आणतात. नगदी पिक असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या हातात थोडयाफार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे.

मोठे शेतकरी हे एक किलो, दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवले जातात. तर काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यवसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करातात. बहुतांशी शेतकरी हे स्व:ताच स्ट्रॉबेरी पाटी किंवा खोक्यात भरुन वणी, नांदुरी, सप्तश्रृंगी गड, सापुतारा रस्त्यांवरही ठिकठिकाणी छोटे-छोटे स्टॉल उभारुन स्ट्रॉबेरी विकताना दिसत आहे. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना यापासून रोजगार उपलब्ध झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com