आदिवासी भागात ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी

आदिवासी भागात ‘सुरगाणा पॅटर्न’  प्रभावी

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

सुरगाणा तालुका ( Surgana Taluka ) आदिवासी भाग असून गुजरात सीमेलगत असल्याने करोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशावेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे. अशी आयुर्वेदिक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले.

या माध्यमातून करोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ ( Surgana Pattern )आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal )यांनी केले.

भुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणार्‍या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहूल रनाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वी करणार्‍या जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर, डॉ. चैतन्य बैरागी, वैद्यकीय अधिकारी कमलाकर चौधरी,

पळसन प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. योगिता जोपळे, सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजेश चौधरी, उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सागर पाटील, डॉ. विजय साठे, डॉ. कल्पेश भोये बाऱ्हे, डॉ. जयेंद्र थविल पांगरणे, डॉ. अनिल हिंडे सराड, डॉ. अक्षय पाटील काळमाणे, डॉ. मधुकर पवार माणी, विजय देवरे, वसंत गावित कठिपडा यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजवळ यांच्या हस्ते करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com