सुरगाणा : अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत

सुरगाणा : अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यात Surgana Taluka आज पाच ते सात वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या ठीक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने भात उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.

काही ठिकाणी खळ्यात कापून रचून ठेवलेली उडवी प्लास्टिक ताडपत्रीने झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली होती. तर भाताच्या आवणात कापून ठेवलेला भात पावसाच्या सरीत भिजल्याने हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला तर जाणार नाही ना अशी काळजी वाटत आहे.

भात,नागली,वरई,उडीद,कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे. करोना काळानंतर महागाईला आधीच तोंड देता देता,आता हाताशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. पिंपळसोंड,पांगारणे, गोंदुणे, हडकाईचोंड, रघतविहीर,उंबरदे,पळसन,आमदा,वांगण, पायरपाडा,पातळी,पळशेत,खडकमाळ ,काशिशेबा, धुरापाडा,सरमाळ मनखेड,जाहूले,हस्ते,कळमणे, बाऱ्हे,ठाणगाव,बेडसे,आंबोडे,खोकरविहीर,खिर्डी,भाटी या भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

रब्बी हंगामातील कांदा रोपे, वालखड, लसून, गहू, हरभरा, वेल पापडी या पिकाची पेरणी सुरु असून जोरदार पावसाने पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com