सुरगाणा : पावसाअभावी पिके संकटात
नाशिक

सुरगाणा : पावसाअभावी पिके संकटात

Abhay Puntambekar

हतगड। वार्ताहर Surgana / Hatgad

आषाढी एकादशीपासून पावसाची संततधार धार सुरू होईल या आशेवर आदिवासी शेतकर्‍यांनी नागली, वरई, भात रोपांची लावणी केली, परंतु पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भात, नागली, वरई आदी रोपे उन्हाने करपून लागल्याने सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकरी संकटात सापडला आहे.

यावर्षी १ जूनला पाऊस वेळेत पडल्याने शेतकर्‍यांनी नागली, वरई, भात आधीचे बियाणे वेळेत पेरणी करून रोपे उगवली पेरणी केलेली रोपांची लागवड २१ ते २५ दिवसांत केली तरच शेतीचे उत्पन्न मिळू शकते, परंतु दीड महिन्यात होऊनही समाधानकारक पाऊस झाले नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे. त्या शेतकर्‍यांनी वीज पंप ऑइल इंजिन सौर पंपद्वारे भात शेतीची लागवड केली, परंतु तीही उन्हाने रोपे खराब झाली.

जुलै महिना असल्याने दुबार पेरणी करणे शक्य नाही. आदिवासी भागातील भात, नागली, वरई शेती पावसावर तर शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती पावसाळी शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकर्‍यांना वर्षभराच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करुन शासनास प्रस्ताव सादर करावे, अशी मागणी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांनी केली आहे. शेतकर्‍यांना सध्या आधाराची गरज असल्याने शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

जुलै महिन्यात दरवर्षी स्ट्रॉबेरी, भात, नागली, वरई लागवड होत असे. यावर्षी पाऊस चांगला झाला नसल्याने व नदीनाल्यांना पाणी नसल्याने लावणी लांबणीवर गेली आहे. अशीचपरिस्थिती राहिल्यास आदिवासी भागात करोनासारखे संकट उभे राहील.

पुंडलीक भोये, शेतकरी बोरगाव

सुरगाणा तालुक्यात नागली, वरई शेती डोंगर उतारावर घेतले जात असल्याने आतापर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने रोपे वाया गेली आहेत. दरम्यान, असेच वातावरण राहिल्यास शासनाने सुरगाणा तालुका दुष्काळ जाहीर करावा.

लक्ष्मण शिवराम गवळी, शेतकरी हिरडपाडा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com