सुरगाणा : पळसन भागात रस्त्यांची दैना

अपघातांच्या संख्येत वाढ
सुरगाणा : पळसन भागात रस्त्यांची दैना

पळसन । वार्ताहर Palsan

सुरगाणा तालुक्यातील पळसन व बार्‍हे परिसरात रस्त्यांचा फज्जा उडाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालक व प्रवाशी त्रस्त झाले आहेत. परिसरातील पळसन-बार्‍हे, आबोडे, राक्षसभुवन, भवाडा आदी ठिकाणी जाणार्‍या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे हे रस्तेच खडड्यात अडकल्याचे चित्र दिसत आहे. वाहन चालवताना चालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे शेतीमाल घेऊन जाण्यास तयार होत नाही. खड्डे वाचविण्याचा प्रयत्नात अनेक छोटे-मोठे अपघातही होत आहेत.

सर्व रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यामुळे ग्रामस्थ व परिसरातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे असलेल्या रस्त्याकडे केवळ अधिका-याचे नव्हे तर पदाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातील अनेक छोटे रस्तेही डांबरीकरणाने जोडण्यात आले आहे. उंबरदे ते धुरापाडा माणी हा रस्ता पंतप्रधान गामसडक योजनेतून जोडण्यात आला आहे. हा रस्ता येथुन सुरगाणा, बा-हे या ठिकाणी जातो.या रस्त्यांची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे.

पळसन ते जामुनमाथा या रस्त्यांची काही ठिकाणी दोन तिन महिन्यापूर्वी दुरूस्ती केली होती.माञ ती उखडून गेले आहे. पळसन ते बार्‍हे रस्त्यांची अवस्था एवढी वाईट झाली की हा रस्ता कधी काळी डांबरी होता यावर नविन प्रवाशांना विश्वास बसणार नाही. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सुमारे १६ वर्षापूर्वी पळसन ते बार्‍हे रस्त्याचे डांबरीकरण करण्यांत आले होते. त्यानंतर एकदाही रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही.त्यामुळे या रस्त्याने पायी चालणे अवघडच झाले आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com