नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सीए फांऊडेशन पररीक्षेत नाशिकचा प्रसन्न सुुराणा याने देशात तिसरा क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. नुकत्याच झालेल्या सीए फांऊडेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात प्रसन्नने 400 पैकी 357 गुण प्राप्त केले. देशाचा निकाल 35 टक्के लागला असून, नाशिकच्या विद्यार्थ्यानी चांगले यश मिळविले.

सीएच्या प्रवासातील सीए फांऊडेशन ही पहिली परीक्षा आहे. सर्वच विषय नवीन असतात व विद्यार्थी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील अवघड परीक्षा देत असतात. कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे परीक्षा रद्द झाली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वी परीक्षा घेण्यात आली होती. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने प्रसन्नने नेहमीच शैक्षणिक क्षेत्र गाजविले.

शालेय शिक्षण आदर्श शालेतुन पुर्ण करत दहावीत त्याने 98 टक्के मिळविले होते. नंतर बीवायके महाविद्यातयातुन 12 वीत 93 टक्के गुण मिळतवत यशाचे सातत्य कायम ठेवले. प्रसन्नचे वडील प्रफुल्ल सुराणा व आई सुनीता सुराणा डॉक्टर असून, सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान देत आहे.

प्रसन्नची बहीण सेजल सुराणा नुकतीच सीए परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रसन्नला मांइडस्पार्कचे सीए मयूर सिंघवी व आई - वडीलांचे मार्गर्शन मिळाले. बुलढाणा जवळील मलकापूर येथील छोट्याशा खेड्यातून नाशिकमध्ये सीए करण्यासाठी आलेल्या प्रसाद खर्चे याने सीए फांउडेशनच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याचप्रमाणे मोनल गायखे हिनेही चांगले गुण मिळविले.

नाशिकमधील प्रफुल्लने देशात तिसरा क्रमांक मिळविल्याने सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा निकाल बघितल्यानंतर नाशिक सीएसाठी योग्य ठिकाण असून, सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. काही वर्षापासुन मुंबई किंवा पुणे येथे सीएसाठी जाणारे विद्यार्थी नाशिकला पसंती देत आहेत.
प्रा. सीए लोकेश पारख, संचालक, पारख क्लासेस